spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : दिवाळीत बनवा घरच्या घरी स्वादिष्ट सोनपापडी

सोनपापडी म्हटले की जिभेला पाणी सुटते. सोनपापडी हा मिठाई मधला स्वादिष्ट गोड पदार्थ आहे. सोनपापडी असा पदार्थ आहे की जो तोंडात घातला की लगेच विरघळतो. तसेच मिठाई हा लहानापासून ते मोठ्यापर्यंत आवडणारा पदार्थ आहे. तसेच दिवाळीत आपण वेगवेगळया पद्धतीने गोडाचे पदार्थ बनवत असतो. तसेच सोनपापडी हा पदार्थ तुम्ही पॅनमध्ये देखील बनवू शकता. सोनपापडी ही महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील म्हणजे गुजरात , पंजाब , राजस्थान या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे. तसेच आजकाल पदार्थामध्ये भेसळीचे प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. बाहेरून पदार्थ आणण्यापेक्षा तुम्ही घरात देखील बनवू शकता. तर आज आम्ही तुम्हाला दिवाळीनिमित्त घरच्या घरी स्वादिष्ट सोनपापडी कशा पद्धतीने बनवायची ते सांगणार आहोत. जाणून घ्या रेसिपी.

हे ही वाचा: Diwali 2022: दिवाळीत बनवा घरच्या घरी खुसखुशीत आणि खमंग अशी ‘ शंकरपाळी ‘

सोनपापडी रेसिपी –

साहित्य –

साखर २ कप
१ कप मैदा
१ कप बेसन
तूप (आवश्यकतेनुसार)
२ चमचे दूध
आवश्यकतेनुसार पाणी
१ टीस्पून इलायची पाऊडर
३ टेबल स्पून पिस्ता आणि बदाम

कृती –

सर्व प्रथम एका पॅनमध्ये बेसन आणि मैदा मिक्स करून चांगला परतवून घेणे. चांगला परतवून झाल्यानंतर एका कढईत तूप घालणे आणि त्यामध्ये बेसन आणि मैदाची तयार केले मिश्रण घालून घेणे आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत तूपामध्ये चांगले मिश्रण परतवून घेणे. तयार केलेले बेसन आणि मैदाचे मिश्रण थंड होण्यास बाजूला ठेवणे. त्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये पाणी आणि साखर घालणे एक उकळी आली की त्यामध्ये दूध मिक्स करणे. चांगला पाक तयार करून घेणे. पाक तयार झाल्यास त्यामध्ये तयार केलेले बेसन आणि मैदाचे मिश्रण मिक्स करुन घेणे. मिक्स करून झाल्यानंतर मिश्रण चांगले ढवळून घेणे. मिश्रण चांगले ढवळून झाले की त्याला एका प्लेट मध्ये काढा. आणि चांगले पसरून घ्या. पसरून झाल्यानंतर मिश्रणावर पिस्ता बदाम घालून घेणे. आणि छोटे छोटे पीस कट करून घेणे. अशा प्रकारे दिवाळी खास सोनपापडी मिठाई तयार आहे.

हे ही वाचा: 

Diwali 2022 : दिवाळीत बनवा चविष्ट साजूक तुपातले बुंदीचे लाडू…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss