Diwali 2022 : दिवाळीत बनवा घरच्या घरी बेसनाचे लाडू…

Diwali 2022 :  दिवाळीत बनवा घरच्या घरी बेसनाचे लाडू…

कोरोना काळानंतर दिवाळी हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. दिवाळीची सुरुवात या वर्षी (२१ऑक्टोबर) पासून होत आहे. मग तुम्ही देखील दिवाळीची सुरुवात केली ना ? दिवाळीचे फराळ कुठवर आले ? दिवाळीचे फराळ बाहेरून आणून नका. घरच्या घरी बनवा अगदी सोप्या पद्धतीने दिवाळीचे फराळ.

हे ही वाचा : Diwali 2022: या दिवाळीत बनवा खमंग भाजलेल्या पोह्यांचा चिवडा

 

दिवाळीचे फराळ म्हटले की लाडू आले. आणि लाडू हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. घरच्या तुपात वळलेला लाडू खाणं म्हणजे खरे सुख. लाडू हा पदार्थ अगदी लहानापासून ते मोठयांपर्यंत लोकांना आवडतो. लाडू म्हटले की जिभेला पाणी सुटे. दिवाळी मध्ये डाएट माणसे देखील डाएट विसरून जातात आणि दिवाळीच्या फराळाचा आनंद लुटतात. जर तुम्हाला एका प्रकारचे लाडू खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी खास दिवाळी बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहोत.

बेसनाचे लाडू बनवण्याचे साहित्य –

कप बेसन.

१/४ कप तूप.

१/२ कप पीठी साखर.

१ टीस्पून वेलची पूड ( ईलायची पावडर ).

२ टेबलस्पून ड्रायफ्रुट.

 

बेसनाचे लाडू बनवण्याची कृती –

सर्व प्रथम कढई मध्ये तूप घालून त्यात बेसनाचे पीठ घालून चांगले मंद आचेवर लालसर रंग येईस पर्यंत भाजून घेणे. ३-४ चम्मच दुध (मलाई सोबत) बेसना मध्ये घालून मिक्ष करून घ्यावे ज्याने बेसन मउ होईल, मिक्ष केल्यानंतर बेसनाला एका भांड्यात काढून घ्यावे आणि थंड होऊन द्यावे. थंड झाल्यास बेसन मध्ये पिठी साखर मिक्स करून घ्यावी आणि चांगले पीठ मळून घेणे. त्यानंतर त्या पिठाचे लाडू वळून घ्यावे आणि त्यावर काजू बदाम लावावे. आणि तुमच्यासाठी बेसनाचे लाडू खाण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा :

Diwali 2022: दिवाळीत बनवा घरच्या घरी खुसखुशीत आणि खमंग अशी ‘ शंकरपाळी ‘

 

Exit mobile version