Diwali 2022 : दिवाळीत बनवा पारंपरिक पद्धतीने अनारसे…

Diwali 2022 : दिवाळीत बनवा पारंपरिक पद्धतीने अनारसे…

दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. तसेच आता सर्वांकडे दिवाळीची तयारी चालू आहे. दिवाळी म्हटले की १५ दिवस अगोदरच फराळ करायला घेतात. दिवाळी हा असा सण आहे की त्या सणा निमित्त आपल्याला नवीन वेगवेगळे पदार्थ खायाला मिळतात. तसेच अनारसे हा गोड पदार्थ आहे आणि तो खायाला खूप स्वादिष्ट असतो. जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने अनारसे बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अनारश्यांची ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चला तर मग जाणून घेऊया पारंपरिक पद्धतीने अनारसे कसे बनवायचे.

हे ही वाचा : Diwali 2022 : घरच्या घरी बनवा पारंपारिक पद्धतीने आकाश कंदील

 

अनारसे बनवण्याचे साहित्य –

१ वाटी तांदूळ, १ कप किसलेला गूळ, १ मोठा चमचा तूप, आवश्यकतेनुसार दूध, किंवा दही, अनारश्यांसाठी खसखस, तळणीसाठी तेल किंवा तूप.

 

अनारसे बनवण्याचे कृती –

सर्व प्रथम तांदूळ तीन दिवस भिजत ठेवणे. आणि त्याचप्रमाणे तांदळातील पाणी ३ दिवस बदलणे.

त्यानंतर ३ दिवस तांदूळ चांगले भिजुन झाल्यानंतर चौथ्या दिवशी भिजलेल्या तांदळातुन पाणी काढणे आणि कॉटनच्या कपड्यावर सुकवत ठेवणे. तांदूळ चांगले कोरडे झाले पाहिजे.

कोरडे तांदूळ मिक्सकरमध्ये वाटून घ्या आणि चाळून त्याला एका भांड्यात काढून घ्या.

मग त्या कोरड्यात मिश्रणामध्ये गूळ , दूध , घालून चांगले पीठ मळून घ्या. त्यानंतर पीठ मळून झाल्यानंतर ते आंबण्यासाठी आणखी काही दिवस ठेवावे. हे पीठ आंबण्यासाठी तुम्हाला एक प्लास्टिकचा डबा घ्यावा लागेल आणि त्या डब्यात हे पीठ ५ ते ६ दिवस ठेवावे लागते. ५ ते ६ दिवस ठेवल्यानंतर पीठ चांगले आंबते.

५ ते ६ दिवसानंतर पीठ डब्यातून काढून घेणे आणि त्याचे बारीक गोळे तयार करून घेणे. मग त्यानंतर ते गोळे चांगले गोल आकारात थापून घ्या आणि त्यावर खसखस लावा आणि तुपात चांगले तळून घ्या. आणि तुमच्या साठी दिवाळी खास अनारसे तयार आहे.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिवाळी स्पेशल, घरच्या घरी बनवा ओल्या नारळाच्या करंज्या

 

Exit mobile version