Diwali 2022 : दिवाळीत बनवा सोप्या पद्धतीने पौष्टिक “खजूरचे लाडू”

Diwali 2022 : दिवाळीत बनवा सोप्या पद्धतीने पौष्टिक “खजूरचे लाडू”

दिवाळी २१ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. सगळीकडे दिवाळी फराळ बनवण्याची तयारी चालू आहे. दिवाळी सण म्हटले की घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. दिवाळी फराळाचे पदार्थ म्हणजे तोंडाला पाणीच सुटते. काही लोकांकडे तर फराळाची यादी असते, जी संपता संपत नाही. दिवाळीत दिवाळीचे फराळ नसेल तर दिवाळी साजरी केल्यासारखी वाटत नाही. तसेच दिवाळीचे पदार्थ वर्ष भर टिकून राहतात. दिवाळीचे पदार्थ बनवताना काही गोष्टीची काळजी देखील घेतली पाहिजे. जर तुम्हाला दिवाळीचे तेच तेच फराळ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही यावेळी दिवाळीच्या फराळामध्ये “खजुराचे लाडू” देखील तुम्ही बनवू शकता. तसेच लाडू खाल्याने अशक्तपणा कमी होतो. चला तर मग जाणून घेऊया खजुराचे लाडू कसे बनवायचे.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळी स्पेशल, घरच्या घरी बनवा ओल्या नारळाच्या करंज्या

साहित्य –

बिया काढलेला १ वाटी खजूर

अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट

५-६ बदाम

५-६ काजू

वेलची पूड

१ चमचा भाजलेले तीळ

१ चमचा भाजलेली खसखस

पाव वाटी पिठी साखर

३-४ चमचे सुके खोबरे

 

कृती –

सर्वप्रथम खजूर , शेंगदाण्याचा कूट , बदाम , काजू , वेलची पूड ,तीळ ,खसखस , साखर , सुके खोबरे हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेणे. मिश्रण जास्त बारीक न वाटून घेणे.

त्यानंतर हे पदार्थ खजूर मुळे मऊ होतात.

मग त्या मिश्रणाला लाडूच्या आकारात वळून घेणे आणि त्यावर काजू , बदाम लावून खोबऱ्यामध्ये मिक्सकरून घेणे.

हे ही वाचा :

Diwali 2022: दिवाळीत बनवा घरच्या घरी खुसखुशीत आणि खमंग अशी ‘ शंकरपाळी ‘

 

Exit mobile version