Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत बनवा तांदळाच्या पिठाचे कडबोळे, जाणून घ्या रेसिपी

Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत बनवा तांदळाच्या पिठाचे कडबोळे, जाणून घ्या रेसिपी

दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला. सर्वांकडेच दिवाळीची लगबग दिसत आहे. दिवाळी म्हटले की डोळ्यांसमोर फराळ येतेच. काही लोक दिवाळीचे फराळ १५ दिवस अगोदरच तयार करतात. तसेच कडबोळी हा पदार्थ काही जणांना माहित आहे तर काही जणांना माहित नाही. तर काही जण कडबोळी हा पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. तसेच कडबोळे भाजणीच्या पिठाचे, ज्वारीच्या पिठाचे, देखील बनवले जातात. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून तांदळाच्या पिठापासून कडबोळे कसे बनवायचे ते सांगणार आहोत. आणि कडबोळे करायला वेळ लागत असला तरीही खायची मजाच काही वेगळी आहे.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत बनवा घरच्या घरी तिखट शंकरपाळी

 

साहित्य –

२ वाट्या तांदळाचं पीठ
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा जिरेपूड
पाव वाटी लोणी
चवीनुसार मीठ
कांदा बारीक चिरून घेणे
अर्धा चमचा तिखट
पीठ भिजविण्यासाठी दूध
तेल

 

कृती –

सर्व प्रथम एका भांड्यात तांदळाच्या पिठामध्ये हिंग, जिरेपूड, मीठ, कांदा, तिखट , लोणी हे सर्व घालून मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. त्यानंतर या मिश्रणामध्ये दूध घालून घ्या आणि चांगले कणिक मळून घ्या. कणिक मळून झाल्यानंतर त्याला एका पांढऱ्या कपड्यात ५ मिनिटे बांधून ठेवा. त्यानंतर ५ मिनिटे पूर्ण झाल्यानंतर त्याला कपड्यातून एका भांड्यात घेणे. त्यानंतर त्याचे गोळे तयार करणे आणि चकलीच्या साच्या मध्ये घालणे चकलीच्या साच्या मध्ये घातल्यानंतर तुम्ही कडबोळे लांब शेवया सारखे देखील पाडू शकता किंवा गोल आकारात देखील पाडू शकता. पाडून झाल्यानंतर तेल चांगले गरम करून घेणे आणि तेलामध्ये चांगले तळून घेणे.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिवाळीत बनवा खुसखुशीत खमंगअशी तांदळाच्या पिठाची चकली

 

Exit mobile version