spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : घरच्या घरी बनवा पारंपारिक पद्धतीने आकाश कंदील

दिवाळी हा सण २१ ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. दिवाळी म्हटले की सगळीकडे नवीन वस्तूंची , दागिन्यांची , दिव्यांची , आणि उत्साहाची लगबग पाहायला मिळते. दिवाळी म्हणजे लाईटींगचा झगमग प्रकाश तर काही ठिकाणी मंद मंद उजळणाऱ्या पणत्या. ज्यावेळी दोन्ही प्रकाश एकत्र येतो त्यावेळी दिवाळीचा सण अधिकच खुलून दिसतो.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत बनवा घरच्या घरी बेसनाचे लाडू…

 

दिवाळीच्या दिवशी घरोघरी आकाश कंदील हा कशाप्रकारे प्रकारे लावला आहे. ते पाहण्याची एक वेगळीच मज्जा असते. काही लोक दिवाळीच्या दिवशी कंदील बाहेरून विकत आणतात. पण दरवर्षी कंदीलची कशाला खरेदी करायची. कधीतरी घरात बनवलेला पारंपारिक पद्धतीने आकाश कंदील अंगणात लावून बघूया तरी कसा दिसतो. आकाश कंदील मधून पडणारा प्रकाश निश्चितच आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा ठरेल. दिवाळी साठी आकाश कंदील घरच्या काही साहित्यापासून कसा बनवायचा ते आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून सांगणार आहोत.

फुगा आणि दोऱ्यापासून बनवा आकाश कंदील –

आकाशदिवा बनविणे खूप सोपे आहे. आकाशदिवा बनविण्यासाठी आपल्याला फुगा, दोरा किंवा लोकर, फेव्हिकॉल, पाणी एवढ्या बेसिक गोष्टी लागणार आहेत. सर्व प्रथम आधी फुगा फुगवून घ्या. फुग्याची जेवढी फुगण्याची क्षमता असेल, तेवढा तो फुगवा. त्यानंतर एका बाऊलमध्ये एक फेव्हिकॉलची छोटी बॉटल रिकामी करा. जेवढा फेव्हिकॉल घेतला तेवढेच पाणी त्या बाऊलमध्ये घ्या. हे मिश्रण चांगले एकत्रित करून घ्या. ज्या रंगाचा आकाशदिवा तयार करायचा आहे त्याच रंगाचा दाेरा तुम्ही घ्या. आपण कपडे शिवण्यासाठी जो दोरा वापरतो, तोच दोरा तुम्ही यासाठी देखील वापरू शकता.

 

यानंतर आता ज्या बाऊलमध्ये फेव्हिकॉल आणि पाणी हे मिश्रण एकत्र केले आहे, त्या बाऊलमध्ये एक दोऱ्याचे रीळ टाका. दोऱ्याचे एक टोक मात्र वर ठेवणे यानंतर फुग्याला ज्या ठिकाणी गाठ बांधली आहे, त्याचा आजूबाजूचा खाली भाग सोडणे आणि त्याला दाेरा गुंडाळायला सुरुवात करा. जो भाग आपण रिकामा सोडला आहे, त्या भागातून आपण आकाशदिव्यात जी लाईट सोडणार आहोत . त्याची वायर त्यात टाकून घेणे.

या नंतर तुम्ही दोरा कशाप्रकारे पण गुंडाळू शकता. जोपर्यंत सर्व बाजूने फुगा कव्हर होत नाही. तो पर्यंत दोरा गुंडाळा. त्यानंतर हा फुगा २ दिवस चांगला सुकून घ्या. फुग्यावरचा दोरा सुकला की तो कडक होतो. दोरा कडक झाला की आतला फुगा पिनने फोडून टाका. फुगा फुटल्यानंतर तरी आपण गुंडाळलेल्या दोऱ्यानेच फुग्याचा आकार घेतल्याचे दिसून येते. फुटलेल्या फुग्याचे रबर आकाशदिव्याच्या बाहेर काढून घ्या आणि एक छान लाईट घालून हा आकाशदिवा अंगणात लावा.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस, जाणून घ्या प्रथा

 

Latest Posts

Don't Miss