spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022: या दिवाळीत बनवा खमंग भाजलेल्या पोह्यांचा चिवडा

झटपट नाश्ता करायचा झाला की मग पोहे बनवायचा विचार मनात येतो. कारण तांदळापासून बनवलेले पोहे हे बनवायला सोपे म्हणण्यापेक्षा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असतात. त्याचबरोबर काहींना कोरडे आणि कुरकुरीत पोहे खायला आवडतात. तसेच भाजलेल्या पोह्यांचा चिवडा हा अनेकांना आवडतो. दिवाळीत तर या चिवड्याचा सुंगध घरोघरी दरवळत असतो. असा हा चिवडा नेमका कसा करायचा यासाठी साहित्य आणि कृती लिहून घ्या.

साहित्य:
  • एक किलो पातळ पोहे
  • एक वाटी भाजलेली चणा डाळ
  • एक वाटी शेंगदाणे
  • एक वाटी खोबऱ्याचे कापकाजू आणि बदाम
  • आठ ते दहा हिरव्या मिरच्या
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • धणे पावडर
  • जीरे पावडर
  • हळद
  • हिंग
  • मोहरी
  • मीठ
  • साखर
  • तेल
पोह्यांचा चिवडा करण्याची कृती:
  • पोहे आणि इतर कोरडे साहित्य दोन ते तीन दिवस उन्हात वाळवावे.
  • एका मोठ्या कढईत पोहे चांगले भाजून घ्यावे आणि ताटात काढून ठेवावे
  • शेंगदाणे, डाळ, काजू, बजाम आणि खोबऱ्याचे काप तेलात तळून घ्यावे
  • कढईत तेल आणि मोहरी, मिरची, कढीपत्ता हिंग घालून फोडणी करून घ्यावी.
  • हळद, मीठ टाकून फोडणी तडतडू लागल्यावर त्यात धणे जीरे पावडर टाकावी, वरून चमचाभर साखर पेरावी आणि गॅस बंद करावा.
  • कढईतील फोडणी पोह्यांवर टाकावी.
  • पोहे, फोडणीचे साहित्य, शेंगदाणे, काजू आणि बदाम, खोबऱ्याचे काप एकत्र करून चांगले ढवळून घ्यावे
  • थंड झाल्यावर एका मोठ्या हवाबंद डब्यात चिवडा भरून ठेवावा.

हे ही वाचा:

Kojagiri Pournima 2022: कोजागिरी पौणिमेदिवशी मसाला दूध पिणे ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर

कोजागिरी पोर्णिमेसाठी स्पेशल मसाला दूध कसे बनवायचे, जाणून घ्या रेसिपी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss