Diwali 2022 : दिवाळीतील नरकचतुर्थी सणाची कथा, जाणून घ्या प्रथा

Diwali 2022 : दिवाळीतील नरकचतुर्थी सणाची कथा, जाणून घ्या प्रथा

दिवाळी सण पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला ही तिथी ‘नरकचतुर्दशी’ म्हणून ओळखली जाईल, असे सांगितले. तसेच दिवाळीत नरकचतुर्थी या सणाला खूप महत्व आहे. दिवाळी हा सण ५ दिवसाचा असतो. तर आज आपण “नरकचतुर्थी” सणाबद्दल जाणून घेऊया.

हे ही वाचा : Diwali 2022 : धनत्रयोदशी म्हणजे काय ? जाणून घ्या पूजा विधी

 

नरकचतुर्थी सणाची कथा –

नरकचतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. त्यापासून नरकचतुर्थी हा सण साजरा केला जातो. नरकासुराने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी तपस्या केल्या होत्या. आणि त्या दिवशी अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही, असे वरदान मागून घेतले. त्या वधाच्या योगाने नरकासुराने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या आणि बाकी स्त्रियांचे अपहरण केले होते. आणि त्यांनी काही स्त्रियांना पळून नेले होते. मग त्यांना मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले होते. आणि त्याने स्वतःच्या हव्यासापोटी संपत्ती बळकावली होती. त्याला मिळालेल्या वरदनामुळे देव, गंधर्व आणि मानवांना तो खूप तापदायक झाला होता. गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. या राजधानीवर श्रीकृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. आणि श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. आणि देवांना, राज्यातील प्रजेला आनंद झाला. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.

 

नरकचतुर्थी सणाची प्रथा :

या दिवशी अभ्यंगस्नानाला खूप महत्व आहे. नरकचतुर्थी दिवशी पहाटे उठून उटणे लावून अंघोळ केली जाते. या दिवशी कोकणात पायाखाली “कारेटं” ठेवूनअंघोळ केली जाते. आणि आई – वडिलांचे दर्शन घेतले जाते. आणि यादिवशी पहाटे दिवे लावले जातात. रांगोळी काढल्या जातात. नरकचतुर्थी या सणादिवशी दुःख दारिद्रय विसरून जाणे ही प्रथा आहे.

हे ही वाचा :

Diwali 2022 : अगदी सोप्या पद्धतीत तुम्हला जमतील अशा खास मेहंदी डिझाइन्स

 

Exit mobile version