Diwali 2022 : धनत्रयोदशीच्या दिवशी दरवाजात लावा ‘या’ गोष्टी

Diwali 2022 : धनत्रयोदशीच्या दिवशी दरवाजात लावा ‘या’ गोष्टी

दिवाळी हा सण आनंदाने साजरा केला जातो. तसेच दिवाळी हा सण अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीचा सण हा धनत्रयोदशी पासून सुरुवात होत आहे, आणि भाऊबीजच्या दिवशी हा सण संपतो. तसेच दिवाळी या सणामध्ये धनत्रयोदशीला खूप जास्त महत्व आहे. या दिवशी धनाची पूजा केली जाते तसेच याचबरोबर लक्ष्मी मातेची देखील पूजा केली जाते. यामुळे घरात सुख समृद्धी राहते. धनत्रयोदशीच्या दिवशी घराचे दार सजवणे. आणि काही खास वस्तू ठेवणे. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून धनत्रयोदशीच्या दिवशी दरवाजात कोणत्या गोष्टी लावणे गरजेचे आहे ते सांगणार आहोत.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळी सणात ‘या’ गोष्टी घरात आवर्जून करा

 

धनत्रयोदशीच्या दिवशी दरवाजात लक्ष्मीची पावले लावणे. यामुळे घरात लक्ष्मी मातेचे आगमन होते. लक्ष्मीची पावले मुख्य दरवाजात डाव्या बाजूला बाहेरून आत येत आहे अशा पद्धतीने लावणे. धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते. त्यामुळे लक्ष्मी मातेचे आगमन झाल्यास तिचे पाऊले शुभ मानले जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी दरवाजाला आंबेचे आणि झेंडूच्या फुलाचे तोरण लावणे. कारण आंबेची पाने लक्ष्मी मातेला खूप प्रिय असतात. दरवाजाला तोरण लावणे हे शुभ मानले जाते. आणि घरात सुख समृद्धी नांदते.

तसेच मुख्य दरवाज्यावर पहाटे उठून रांगोळी काढणे. त्यामुळे दरवाज्याला एक प्रकारची शोभा येते.

मुख्य दरवाज्यात तुपाचा दिवा देखील लावणे. दिवा अशा ठिकाणी लावणे ज्या ठिकाण्यावरून घरात प्रकाश येतो. अशा बाजूला लावणे. दिवा लावण्याने घराच्या चारही बाजूला रोषणाई राहते.

धनत्रयोदशीच्या दिवशी दारात तुळशीचे रोप लावणे. तसेच तुळशीचे रोप लावण्याने घरात सुख नांदते. आणि तुळशीच्या पानाचे सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहते. तुळशीचे रोप लावल्यास घरात लक्ष्मीचा वावर राहतो आणि ती प्रसन्न देखील होते. तसेच अंगणात तुळशीचे रोप असणे शुभ मानले जाते.

हे ही वाचा : 

Diwali 2022 : दिवाळीत दिवे का लावले जातात ? जाणून घ्या महत्व

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version