Diwali 2022 : दिवाळीत आकर्षित करणाऱ्या चॉकलेट फटक्यांपासून दूर रहा

Diwali 2022 : दिवाळीत आकर्षित करणाऱ्या चॉकलेट फटक्यांपासून दूर रहा

दोन वर्षानंतर कोरोनाचे निर्बंध नसल्याने या वेळी दिवाळी (Diwali festival) हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. तसेच दिवाळी हा सण (२१ ऑक्टोबर) पासून सूर होत आहे. दिवाळी निमित्त बाजारपेठ खरेदीसाठी गजबजलेली दिसत आहे. (The market is very decorated on the occasion of Diwali) आणि बाजारपेठांमध्ये नागरिकांची खूप गर्दी देखील पाहायला मिळत आहे. दिवाळी म्हटले की फराळ आणि फटाके आलेच. पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषण होऊ नये (Pollution in terms of environment) म्हणून दिवाळीत जास्त प्रमाणात फटाके फोडू नये असे सांगण्यात येते. तरी पण नागरिक मोठ्याप्रमाणत फटाके फोडताना दिसतातच. या वेळी मार्केट मध्ये प्रदूषण टाळण्यासाठी आपल्याला फटाके एका वेगळया अंदाज मध्ये पाहायला मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया कोणते फटाके आहेत मग ते.

हे ही वाचा : Diwali 2022 : धनत्रयोदशीला करू नका ‘या’ वस्तूंची खरेदी

 

दिवाळीत फटाके फोडायला लहानापासून ते मोठ्यापर्यंत लोकांना आवडते. आपण दिवाळीत दरवर्षी मोठ्या प्रमाणत फटाके खरेदी करतो. आणि या मुळे प्रदूषण होते. प्रदूषण होऊ नये म्हणून जनजागृती केली जाते. हीच बाब लक्षात घेऊन पुण्यातील एका दुकानदार मालकाने १० ते १५ वर्षापूर्वी चॉकलेट फटाके बनवणे सुरू केले. दिवाळीत फटाके फोडले नाहीतर दिवाळी साजरी केली नाही असे वाटणार नाही. याच उद्देशाने चॉकलेट फटाके बनवण्याची सुरुवात झाली.

 

यावर्षी मोठ्या प्रमाणात फटाकेने मार्केट सजताना दिसत आहे. आणि फटाके पासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. फटाक्यांमुळे अनेक दुर्घटना घडताना दिवाळीत दिसतात. फटाक्यांवर बंदी असली तरी नागरिक फटाके मोठ्या प्रमाणात फोडतात आणि पर्यावरणाचे प्रदूषण बिगडून टाकते. यावेळी मार्केट मध्ये सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी मार्केटमध्ये चॉकलेट फटाके आले आहे. आणि या फटाकेला मागणी देखील खूप आहे. या चॉकलेट फटाके मध्ये आपल्याला रॉकेट, भुईचक्र, लक्ष्मी बॉम्ब, बॉम्ब इत्यादी पाहायला मिळतात. तसेच चॉकलेट फटाके मध्ये १०० रुपयांची वाढ होतांना दिसली आहे.

चॉकलेट फटाक्यांपासून प्रदूषण टाळता येते आणि जिवाची हानी देखील होत नाही. यावेळी चॉकलेट फटाक्यांचे गिफ्ट हॅम्पर बनविण्यात आले असून या चॉकलेटच्या गिफ्ट हॅम्परला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिवाळीत बनवा पारंपरिक पद्धतीने अनारसे…

 

Exit mobile version