Diwali 2022 : दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस, जाणून घ्या प्रथा

Diwali 2022 : दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस, जाणून घ्या प्रथा

आनंदाचा आणि उत्साहाचा दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीचे पहिले ५ दिवस खूप महत्वाचे असतात. या दिवसाचे धार्मिक वेगवेगळे महत्व आहे. तर आज आपण वसुबारस म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत. दिवाळीच्या सणांची सुरुवात वसुबारस या सणापासून होते.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळी का साजरी केली जाते ? घ्या जाणून

 

दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस (Vasubaras) होय. हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास “गोवत्स द्वादशी” असेही म्हणतात. या मध्ये गाय आणि तिचे वासरू याची पूजा केली जाते. यावर्षी दिवाळीची सुरुवात (२१ऑक्टोबर) पासून होत आहे. गाय आणि तिच्या वासरू मधले प्रेम हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक मानले जाते. म्हणून देव-भक्त, आई-मूल, गुरु-शिष्य यामधील प्रेमसंबंधालाही आपली संतमंडळी नेहमी गाय-वासराच्या प्रेमाची उपमा देतात.

 

वसुबारसची प्रथा –

या दिवशी गाईच्या आणि तिच्या वासराची ( गोधनाची) पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या ईच्छा पूर्ण होण्यासाठी गाई सोबत तिच्या वासराची देखील पूजा केली जाते. वसुबारस या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढली जाते. बहुतेक स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. या दिवशी गाय आणि वासरुला आंघोळ घातली जाते. आणि त्यांचा अंगाला हळद लावली जाते. आणि त्यांना नवीन वस्त्रे देखील घातले जाते. आणि या दिवशी गहू , मूग खात नाही. बहुतेक स्त्रिया बाजरीची भाकरी खाऊन उपवास सोडतात. आपल्या पदरात चांगले आयुष्य लाभावे आणि मुला- बाळांचे आरोग्य निरोगी आणि सुंदर राहण्यासाठी वसुबारसची पूजा केली जाते. आणि या दिवशी घराचा समोर आणि तुळशीच्या इथे दिव्यांची रोषणाई केली जाते.

हे ही वाचा :

Diwali 2022 : नवरा बायकोच्या प्रेमाचं नात जपणारा ‘दिवाळी पाडवा’ सणाची जाणून घ्या परंपरा

 

Exit mobile version