spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : दिवाळी सणामध्ये हटके लूक करण्याचा विचार करताय ? मग नकी करून बघा बोल्ड आय मेकअप…

दिवाळी हा सण खूप उत्साहाचा असतो. दिवाळीमध्ये मुलींना नटायला आणि सजायला खूप आवडते. त्यासाठी मुली वेगवेगळया मेकअप ट्रिकचा (Makeup trick) वापर करत असतात. तसेच तुम्ही नेहम डोळ्यांना काजळ (kajal) आणि लायनर (eyeliner), आयशॅडो (eyeshadow,) वापरत असाल. हे वापरून तुम्ही कंटाळत असाल. तसेच मुलींना देखील सुंदर दिवसायला आवडते. सुंदर आणि अनोखी लूक केल्यास चेहऱ्याला एक वेगळाच लूक येतो आणि आपला चेहरा खूप सुंदर दिसू लागतो. तुम्ही सेलिब्रिटी सारखे आय मेकअप (Eye makeup) देखील करू शकता. तर आज आम्ही तुम्हाला बोल्ड आय मेकअप (Bold eye makeup) काही दाखवणार आहोत.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत घरच्या अंगणात काढा ट्रेंडी आणि सुंदर रांगोळया…

जर दिवाळीत ऑफिसला जाताना कुर्ता प्लाजो घालत असाल तर तुम्ही ब्लॅक स्मोकी (Black Smokey) आय मेकअप (Eye makeup) करू शकता. आजकाल ब्लॅक स्मोकी आय मेकअपचा ट्रेंड चालू आहे. ब्लॅक स्मोकी आय मेकअपमुळे आपल्या चेहऱ्याला एक वेगळाच लूक येतो आणि तो खूप उठून देखील दिसतो. तसेच तुम्ही एथनिक लूक करण्याचा विचार करताय तर त्यावर देखील तुम्ही ब्लॅक स्मोकी आय मेकअप करू शकता.

 

तुम्ही दिवाळीत काही पिंक कुर्ता किंवा साडी घालण्याचा विचार करताय तर तुम्ही गुलाबी कट क्रीज आयशॅडो (pink cut crease eyeshadow) देखील करू शकता. काहीजणांना कपड्या प्रमाणे लूक करायला आवडतो. जर तुम्ही दिवाळीत वेगवेगळया रंगाचे आऊटफिट करण्याचा विचार करताय तर तुम्ही त्या प्रमाणे आय मेकअप करू शकता.

जर तुम्ही दिवाळीत एकदा वन पीस (One piece) किंवा साडी , ड्रेस घालण्याचा विचार करताय तर तुम्ही ब्राऊन स्मोकी आय मेकअप (Brown smokey eye makeup) करू शकता. हा मेकअप तुम्ही अनेक फेस्टिव्ह सीझनसाठी करू शकता. किंवा सिम्पल लूकसाठी देखील करू शकता.

गोल्डन आय मेकअप (Golden Eye Makeup) जर तुम्ही गोल्डन साडी , किंवा अजून काही घालण्याचा विचार करताय तर त्यावर तुम्ही गोल्डन आय मेकअप करू शकता. गोल्डन आय मेकअप मुळे आपल्याला एक गोल्डन लूक मिळतो.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिवाळीत स्पेशल घ्या… मुलांसाठी ट्रेंडी कपडे

Latest Posts

Don't Miss