spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीवर असेल सूर्यग्रहणाची छाया

यंदा २४ ऑक्टोबरला दिवाळी साजरी होणार आहे. पण दिवाळीवरही (Diwali 2022) सूर्यग्रहणाची छाया (Surya Grahan 2022) असल्याने यंदाची दिवाळी खास असणार आहे. सूर्यग्रहण नेहमीच अमावस्या तिथीला होते आणि दिवाळीही अमावस्या तिथीला असते.

यंदा २४ ऑक्टोबरला दिवाळी साजरी होणार आहे. पण दिवाळीवरही (Diwali 2022) सूर्यग्रहणाची छाया (Surya Grahan 2022) असल्याने यंदाची दिवाळी खास असणार आहे. सूर्यग्रहण नेहमीच अमावस्या तिथीला होते आणि दिवाळीही अमावस्या तिथीला असते. यंदा दिवाळीत असा योगायोग घडला आहे की, दिवाळीच्या रात्रीपासूनच सूर्यग्रहणाचे सुतक सुरू होणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी होणार्‍या वर्षातील दुसऱ्या सूर्यग्रहणाच्या खास गोष्टी जाणून घेऊया.

दिवाळी २०२२ तिथी –
दिवाळी सण: २४ ऑक्टोबर २०२२ रोजी
कार्तिक अमावस्‍या तिथी २४ रोजी सायंकाळी ५:२८ पासून सुरू होत आहे.
कार्तिक अमावस्या समाप्ती: २५ ऑक्टोबर ते ४:१८ पर्यंत

२५ ऑक्टोबर रोजी दुपारी २:२९ वाजता सूर्यग्रहण सुरू होत आहे. सूर्यग्रहणाबाबत एक नियम आहे की त्याचे ग्रहण सुरू होण्यापूर्वी १२ तास सुतक लागते. त्यामुळे २४ ऑक्टोबर दिवाळीच्या रात्री २.३० वाजता सूर्यग्रहणाचे सुतक सुरू होणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण सुमारे ४ तास ३ मिनिटांचे असेल. आणि या ग्रहणाचा उद्धार भारतात दिसणार नाही कारण सूर्यग्रहण संपण्यापूर्वीच सूर्यास्त होईल. हिंदू पंचांगानुसार, २४ ऑक्टोबर २०२२ रोजी दिवाळी साजरी केली जाईल तर दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण होईल. अशा परिस्थितीत सूर्यग्रहणाचा दिवाळी पूजेवर कोणताही परिणाम होणार नाही.

दिवाळीची रात्र दिव्यांनी झगमगेल आणि सूर्यग्रहणाचा दिवाळी सणावर कुठलाही अशुभ परिणाम होणार नाही. दिवाळीची रात्र साधनेसाठी अतिशय चांगली मानली जाते. यावेळी देवी कालीची पूजा, तंत्र साधना केली जाते. महानशीठ काळची वेळ सोमवार २४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून ५५ मिनिटे ते मंगळवार २५ ऑक्टोबर दुपारी ०१ वाजून ५३ मिनिटापर्यंत असेल. दिवाळीच्या रात्री ग्रहणाच्या सुतकामुळे ही रात्र तंत्र साधना आणि सिद्धीसाठी खूप खास असेल. या रात्री जागरण केल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप केल्यास खूप फायदा होईल.

हे ही वाचा :

Diwali 2022 : जाणुन घ्या लक्ष्मी पूजनचे महत्त्व, आणि पूजा विधी

Diwali 2022 : अगदी सोप्या पद्धतीत तुम्हला जमतील अशा खास मेहंदी डिझाइन्स

Diwali 2022 : धनत्रयोदशी म्हणजे काय ? जाणून घ्या पूजा विधी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss