Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत खिशाला झळ ! फटाक्यांच्या दारात देखील वाढ

मुंबईसह संपूर्ण जगभर साजरा केला जाणार दिवाळी सण हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या तयारीसाठी अनेकांची लगबग सुरू झाली आहे. खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीला यंदा महागाईचे ‘फटाके’ बसले आहेत.

Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत खिशाला झळ ! फटाक्यांच्या दारात देखील वाढ

मुंबईसह संपूर्ण जगभर साजरा केला जाणार दिवाळी सण हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या तयारीसाठी अनेकांची लगबग सुरू झाली आहे. खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीला यंदा महागाईचे ‘फटाके’ बसले आहेत. विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किंमतीमध्ये ३० ते ४० टक्क्यांपर्यंतची मोठी वाढ झाली. त्यामुळे दिवाळीत फटाके खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

यावर्षी फटाका विक्री व्यवसायाला विक्रमी दरवाढीचे ग्रहण लागले आहे. फटाके निर्मितीसाठी बेरियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट, अल्युमिनियम पावडर, कॉपर कोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी अशा कच्च्या मालाचा वापर केला जातो. यंदा यापैकी अनेक गोष्टींच्या किंमतीमध्ये लक्षणीय अशी वाढ झाली. शिवाय कामगारांची वाढलेली बेसुमार मजुरी तसेच डिझेल-पेट्रोलच्या किंमतीतील सततच्या वाढीमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च, विजेचे वाढलेले दर या सर्व बाबींमुळे फटाक्यांच्या किंमती वाढल्या आहेत. शिवाय दारूगोळा आणि रसायनांच्या किमती वाढल्याने शिवकाशी येथून मागवलेले फटाके वाढीव दराने बाजारपेठेत आले आहेत. यंदा फटाक्यांच्या दरामध्ये सरासरी २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. फटाक्यांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या विविध साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली. सातत्याने इंधन दरवाढ होते. त्यामुळे फटाक्यांचे दर वाढले आहेत.

यंदा नागरिकांमधील उत्साह लक्षात घेता फटाक्यांची विक्री वाढून मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. त्यातच विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. सुतळी बॉम्ब, बुलेट बॉम्ब, पोपट, लवंगी आदी आवाजांच्या फटाक्यांचे पाच ते १५ टक्क्यांपर्यंतचे दर वाढले. फुलझड्या, झाड, चक्री, रॉकेट या प्रकारच्या नामांकित व इतर कंपन्यांच्या किंमतीमध्ये १५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सर्वाधिक २० ते ४० टक्के दरवाढ आकाशात उडणाऱ्या फटक्यांची झाली आहे. एकूण सर्व प्रकारच्या फटाक्यांची दरवाढ लक्षात घेता सरासरी २० टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

नवरात्रोत्सव, विजयादशमीबरोबरच नागरिकांना आता दीपोत्सवाचे वेध लागले आहेत. अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीनिमित्त अनेक घरांमध्ये नियोजनाला सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हटलं की रुचकर फराळ, विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी असते. त्यामुळे या काळात फटाक्यांच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होते. मागील दोन वर्षे कोरोनामुळे दिवाळीसह सर्वच सणांवर काही निर्बंध होते, त्यामुळे फटाक्यांसह सर्वच बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला. यंदा सर्व निर्बंध हटल्याने दिवाळी धूमधडाक्यात साजरी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीची फटाके बाजारात महागाईचा आवाज घुमू लागला आहे.

देशात फटाक्यांचे ९५ टक्के उत्पादन शिवकाशी येते होते, तर उर्वरित ५ टक्के उत्पन्न ग्वाल्हेर, सायपूर आदी ठिकाणी होते. शिवकाशी परिसरात गतवर्षी जानेवारीपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर आलेल्या पोंगल सणामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली, परिणामी उत्पादन उशिरा सुरू झाले. दरवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत केवळ ५५ ते ६० टक्के उत्पादन झाले असल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जाते. तसेच यंदा सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. घरत उपयोगी येणाऱ्या वस्तुंपासून ते फटाक्यांपर्यंत सर्वच किंमतीत यंदा वाढ झाली आहे.

फक्त नाशिक किंवा इतर जिल्ह्यातच नव्हे तर मुंबईसह संपूर्ण भारतात फटाक्यांची ४० टक्के वाढ हि झाली आहे. फटाक्यांचे मूळ स्थान असणारे शिवकाशी येथूनच फटाके हे वाढीव दराने बाजारपेठेत आले आहेत त्यामुळे संपूर्ण भारतात फटाक्यांचे दर हे वाढलेले आहेत असे श्री लक्ष्मी फायरवर्क्स या दुकानाचे मालक (नवीमुंबई – सानपाडा) ओंमकार बेर्डे यांचे मत आहे.

हे ही वाचा :

T20 World Cup In Marathi : मनसेच्या इशाऱ्यानंतर राज ठाकरेंना भेटणार ‘स्टार’

INS Arihant : INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

G. N. Saibaba : प्रा. साईबाबांच्या निर्दोष सुटकेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version