spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : दिवाळीतील ट्रेंडिंग दागिने तुमचे सौंदर्या वाढू शकते…

दिवाळी या सणाला १ दिवस उरला आहे. दिवाळीमध्ये खरेदी करण्याची लगबग आपल्याला दिसत आहे. तसेच आपण खरेदी नेहमी करत असतो . तरीपण आपल्याला समाधान वाटत नाही. कारण दिवाळी हा सण उत्साहाचा असतो. आपण कितीही खरेदी केली तरी दिवाळीची खरेदी ही जरा खास असते. दिवाळीमध्ये खरेदी करताना आपण जे ट्रेंडिंग (Trending) चालू आहे ते जास्त प्रमाणात खरेदी करतो. जसे की ट्रेंडिंग ड्रेस (Trending Dress) , ट्रेंडिंग दागिने (Trending jewelry) इत्यादी आपण खरेदी करत असतो. फेस्टिवल (festival) मध्ये काही लोकांना ट्रेडिशनल आउटफिट्स घालायला आवडतात. ज्या मध्ये तुम्ही ट्रेडिशनल आउटफिट साठी वेगवेगळया प्रकारचे ट्रेंडी दागिने Trendy jewelry घालू शकतो. सणासुदीच्या काळात तुम्ही कोणत्या प्रकारचे Trendy jewelry वापरू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत घरच्या अंगणात काढा ट्रेंडी आणि सुंदर रांगोळया…

 

जर तुम्ही दिवाळीत कुर्ता प्लाजो(Kurta Plajo) किंवा कुर्ता लेंगगिन्स (Kurta Leggings) अशा तुम्ही जर आऊटफिट केला तर तुम्ही त्यावर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी (Oxidized jewelry) ट्राय करू शकता. किंवा तुम्ही एथनिक लूक साठी बांगड्या, कानातले , ब्रेसलेट असे देखील वापरू तुम्ही स्टाईल(style) करू शकता.

तुम्ही एलिगेंट लुक साठी म्हणजे लेहंगा चोली(Lehenga Choli) इत्यादी डायमंड ज्वेलरी (Diamond Jewellery) किंवा shaya silver हे देखील jewelry तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये तुम्ही डायमंड रिंग , ब्रेसलेट, कानातले , तसेच तुम्ही shaya silver मध्ये देखील ब्रेसलेट, कानातले देखील तुम्ही वापरू शकता.

 

जर तुम्ही दिवाळीत साडी वैगेरे घालण्याचा ट्राय करत असाल तर तुम्ही त्यावर कुंदन ज्वेलरी (Kundan Jewellery) वापरू शकता. जर तुम्ही लक्ष्मी पूजनला नवारी साडी घालण्याचा विचार करत असला तर तुम्ही त्यावर चिंच पेटी दागिने घालू शकता. यामध्ये तुम्ही साडीच्या रंगाप्रमाणे दागिने खरेदी करू शकता.

जर तुम्ही दिवाळीत वन पीस (One piece) घालत असाल तर तुम्ही त्यावर पर्ल ज्वेलरी (Pearl Jewelry) घालू शकता. किंवा तुम्ही फ्लोरल प्रिंट आऊटफिट करत असाल तर तुम्ही त्यावर पर्ल ज्वेलरी देखील वापरू शकता. पर्ल ज्वेलरी मुळे क्लासीक लूक (Classic Look) आपल्याला मिळतो. तसेच क्लासीक लूक बहुतेक लोकांना करायला आवडते.

हे ही वाचा : 

Diwali 2022 : दिवाळीत बनवा घरच्या घरी स्वादिष्ट सोनपापडी

 

Latest Posts

Don't Miss