spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : धनत्रयोदशी म्हणजे काय ? जाणून घ्या पूजा विधी

कोरोनाच्या काळानंतर दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होताना दिसणार आहे. दिवाळी या सणाला अवघे १० दिवस बाकी आहे. सगळीकडे दिवाळी सणांची खरेदी चालू आहे. दिवाळी या सणाचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. सगळीकडे पणत्या लावुन झगमगाट आणि रोषणाई केली जाते. दिपावली हा आनंदाचा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा सण आहे. सर्वजण एकत्र येउन हा पाच दिवसांचा उत्सव मोठया आनंदाने साजरा करतांना दिसतात. धनत्रयोदशी या सणाला दिवाळी मध्ये खूप महत्व आहे. तर आज आम्ही तुम्हाला या लेख मधून धनत्रयोदशी म्हणजे काय ? आणि त्याची पूजा विधी सांगणार आहोत.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस, जाणून घ्या प्रथा

 

धनत्रयोदशी म्हणजे काय ? –

धनत्रयोदशी म्हणजे धन अर्थातच या दिवशी धनाची म्हणजे लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. तसेच या दिवशी दागिन्यांची देखील पूजा केली जाते. दिवाळी या सणामध्ये बाकी सणाला जसे महत्व आहे. तसेच धनत्रयोदशी या सणाला देखील महत्व आहे. धनत्रयोदशी या दिवशी काही लोक सोने खरेदी करतात. तसेच या वेळी धनत्रयोदशी २२ ऑक्टोबर रोजी आहे. ज्यावेळी इंद्रदेवाने असुरासमवेत समुद्रमंथन केले त्यावेळी त्यातुन देवी लक्ष्मी प्रकट झाली त्यानंतर समुद्रातून अमृतकुंभ घेउन धन्वंतरी प्रकटले म्हणुन या धनत्रयोदशीला धन्वंतरीची पुजा करण्याची पध्दत आहे. या दिवसाला “धन्वंतरी जयंती” (Dhanvantari Jayanti) असेही म्हटले जाते.

धन्वंतरी यांना भगवान विष्णुचा अवतार देखील समजले जाते. सर्व वेदांमधे ते निष्णात होते, मंत्र तंत्राचे ते उत्तम जाणकार होते त्यांच्या अलौकीक सामथ्र्यामुळे अमृतरूपाने अनेक औषधींचे सार देवांना प्राप्त झाले आणि म्हणुनच धन्वंतरींना देवांचे वैद्यराज म्हटले जाते. तिन्ही सांजेला ईशान्य दिशेकडे तोंड करून भगवान धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दिर्घायुष्याचा लाभ मिळतो अशी मान्यता आहे.

 

धनत्रयोदशी पूजा विधी –

धनत्रयोदशी दिवशी पूजेसाठी सर्व प्रथम एक चौरंग घेणे आणि त्यावर लाल कापड पसरून घ्यावे. आणि त्या चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी काढणे. त्यानंतर गंगाजल शिंपडून माता महालक्ष्मीची मूर्ती स्थापित करून घ्यावी. आणि तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी. पूजा करतांना लाल रंगाची फुले वापरावी. या दिवशी धातू ,दागिने ,धन हे देखील चौरंगावर ठेवावे आणि त्याची देखील पूजा करावी. आणि पूजेदरम्यान लक्ष्मी स्तोत्र आणि लक्ष्मी चालीसा पठण करावे.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिवाळी का साजरी केली जाते ? घ्या जाणून

 

Latest Posts

Don't Miss