Diwali 2022 : दिवाळी पहाट म्हणजे काय ? जाणून घ्या

Diwali 2022 : दिवाळी पहाट म्हणजे काय ? जाणून घ्या

कोरोनाच्या काळानंतर सगळीकडे दिवाळी पहाट हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. दिवाळी हा सण २१ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. तसेच दिवाळीत आपल्याला दिवाळी पहाट हा सण देखील साजरा करायला मिळतो. दिवाळी मध्ये दिवाळी पहाट हा सण २२ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येत आहे. दिवाळी पहाट हा सण आनंदाने आणि धुमधड्याक्यात साजरा केला जातो. दिवाळी पहाट दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. चला तर मग जाणून घेऊया दिवाळी पहाट बद्दल.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत मिठाई विकत घेणार आहात का ? तर ‘या’ गोष्टीची काळजी नक्की घ्या

 

दिवाळी पहाट म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस. दिवाळी पहाट ही अगदी मानाची, प्रेमाची, आदराची गोष्ट ठरली. दिवाळी पहाट या सणाला देखील खूप महत्व आहे. दिवाळी पहाटची गोष्टच वेगळी आहे. दिवाळी पहाटच्या दिवशी पहाटे उठून अंगाला उटणे लावून स्नान केले जाते. आणि कुलदेवतांची पूजा केली जाते. या दिवशी पहाटेच अंगणात मोठ्या मोठ्या रांगोळी काढली जाते . आकाश कंदीले लावले जातात . सगळीकडे दिवे लावले जाते. यादिवशी कुलदेवतांना प्रसाद म्हणून दिवाळीचा फराळ दाखवला जातो. दिवाळीच्या पहाटे दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाते. जसे की काही ठिकणी संगीत कार्यक्रम ठेवले जाते, भजन मंडळीला देखील आमंत्रण केले जाते.

तसेच या दिवशी दिवाळीत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्या दिल्या जातात. आणि फराळा आमंत्रण केले जाते. दिवाळीच्या पहाटे दिवशी कलाकार, निवेदक, व्यासपीठ, सजावटकार, यांचे मानधन, प्रायोजक अशा सगळ्या गोष्टींमुळे दिवाळी पहाट हा वार्षिक व्यावसायिक कार्यक्रम बनला आहे. तसेच दिवाळी हा एक इव्हेंट झाला आहे. दिवाळी पहाटची सुरुवात ही पहाटे पासून ते दुपार पर्यंत असते. तसेच दिवाळी पहाट ही आपल्याला गावच्या ठिकाणी देखील साजरी करतांना दिसते. काही ठिकाणी तर पहाटेच गाण्यांची सांस्कृतिक मैफल सुरू करतात. तसेच या दिवशी पेशवाई पद्धतीने, पुणेरी पद्धतीने दारात अत्तर गुलाब देऊन, नऊवारी साड्यांमध्ये युवतींनी केलेले स्वागत असो, किंवा प्रत्येकाला पेढा, कपाळावर केशरयुक्त गंध लावणे असो, त्याचबरोबर जुन्या काळातील वासुदेव, पिंगळा यांचा तेथे वावर पाहायला मिळतो.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिवाळीत आकर्षित करणाऱ्या चॉकलेट फटक्यांपासून दूर रहा

 

Exit mobile version