Diwali 2022 : दिवाळीत किल्ला का बांधतात ? जाणून घ्या…

Diwali 2022 : दिवाळीत किल्ला का बांधतात ? जाणून घ्या…

दिवाळी या सणाला उद्यापासून सुरुवात होत आहे. दिवाळीमध्ये आपण कपडे, दागिने, कंदील , पणत्या अशी आपण खरेदी करतो. तसेच दिवाळीत आईला फराळ बनवण्याचा आनंद आणि उत्साह असतो. लहानमुलांना किल्ला बनवण्याचा उत्साह असतो. लहापणी किल्ला बनवण्याची एक वेगळीच मज्जा असते. आपण जेव्हा लहान होतो, त्यावेळी शाळेला दिवाळीची सुट्टी कधी मिळते ? आणि कधी आपण किल्ला बनवतो असा उत्साह असायचा. दिवाळीची सुट्टी पडली की आपण किल्ला बनवण्यासाठी साहित्य जमा करण्याची सुरुवात करायचो. तसेच महाराष्ट्रात किल्ला बनवण्याचे वेगवेगळी कारणे आहेत. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून दिवाळीत किल्ला का बांधतात ते सांगणार आहोत.

हे ही वाचा: Diwali 2022 : मुंबईत परवान्याशिवाय फटाकेविक्रीवर बंदी!

 

लहान मुले म्हणजे ईश्वराचे रूप. तर काही जण लहान मुले म्हणजे देवा घरची फुले असे देखील म्हणतात. लहान मुलांमध्ये खूप निर्मळता असते. कारण लहान मुलांवर कमी संस्कार झाले असतात. ११ – १२ वर्षांतील मुले ही थोडी निरागस असतात. तसेच लहानमुलांना नवीन नवीन वस्तू बनवायचे वेड असते. लहान मुले आजकल खूप ऍक्टिव्ह असतात. मुलांमध्ये ईश्वराकडून आलेली उर्जा ग्रहण करण्याची क्षमता असते. म्हणून हे कार्य लहान मुलेच करतात.

 

किल्ला का बनवतात कारणे :

किल्ले हे अनेक मोठमोठ्या मोहीम व लढायांचे, सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणाचे, जय-पराजयाचे, शौर्य, पराक्रम, अशा सुवर्ण क्षणांचे साक्षीदार आहेत. तसेच दिवाळीत किल्ला का बनवायचा हा प्रश्न मुलांना खूप पडतो ? याचे कारण असे की जुन्या काळी वाहनांची साधणे नव्हती, म्हणून लोक किल्ले पाहायला जायाची. आणि आई-वडील आपल्या मुलांना किल्लायाची गोष्ट सांगत असत. त्यामध्ये किल्ल्यांचे बांधकाम, त्यावर असणारे बुरुज असे प्रकारे मुलांना किल्ल्यांचा इतिहास सांगत असत. तसेच किल्ला बनवणे ही आपली एक संस्कृती आहे. त्यामुळे लहानमुलांना एका प्रकारची आपली संस्कृती कशा प्रकारे जपली पाहिजे हे समजते. किल्ला बनवण्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे लहान मुलांना किल्लयांचा इतिहास कळतो. आणि त्यामागील काही कारणे देखील कळतात. किल्लयांमुळे मुलांना एक सकारत्मक विचार करण्याची मदत होते. आणि दिवाळीत सुट्ट्यांचा आनंद घ्यावा आणि शारीरिक मानसिक चालना म्हणून किल्ला बनवण्याची परंपरा झाली आहे.

हे ही वाचा: 

Diwali 2022 : दिवाळीनिमित्त सजली बाजारपेठ, आकाशकंदील,रांगोळी, दिवे खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी…

 

Exit mobile version