spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : तुळशी विवाह का करतात ? जाणून घ्या…

दिवाळी (Diwali) या सणाला सुरुवात झाली. तसेच दिवाळी हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. दिवाळी हा संपल्यावर तुळशी विवाह (Tulsi Vivah 2022) करतात. तसेच तुळशीचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. रोज तुळशीचे सेवन केल्याने अनेक आजार बरे होतात. अंगणात तुळशीचे रोप असावे त्यामुळे घरात सुख सम्रुद्धी नांदते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच दिवाळी नंतर तुळशीच्या लग्नाला देखील हिंद धर्मात खूप महत्व आहे. तर आज आम्ही या बातमी मधून तुम्हाला तुळशीच्या विवाह बद्दल सांगणार आहोत.

 

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत स्पेशल घ्या… मुलांसाठी ट्रेंडी कपडे

 

तुळशीचे खरे नाव वृंदा आहे. तसेच तिचा जन्म राक्षस कुळात झाला आहे. आणि ती विष्णूची मोठी बहिण आहे. वृंदा म्हणजे तुळशी तिचे लग्न जलंधर नावाच्या राक्षसाशी करण्यात आला. तसेच वृंदा ही पतिव्रता स्त्री होती. तिची भक्ती आणि पुजेमुळे तिचा पती जलंधराचा विजय होत गेला आणि त्याला आपल्या विजयावर त्याला गर्व वाटू लागला आणि त्याने स्वर्गावर आक्रमण करत देवांच्या कन्यांना आपल्या ताब्यात घेतले. यासाठी सर्व देव विष्णूच्या दरबारात गेले आणि ती लोक जलंधराचा अंत करण्यासाठी विष्णू देवाकडे प्रार्थना करू लागले. पण जलंधराचा मृत्य करण्यासाठी वृंदाचा मृत्यू करणे गरजेचे होते. भगवान विष्णूंनी मायाजालचा वापर करत जलंधरचे रूप धारण केले आणि वृंदाच्या पतिव्रता धर्माला नष्ट केले याचा परिणाम म्हणून जलंधरची शक्ती संपत गेली आणि तो युद्धात ठार मारण्यात आला.

 

पण जेव्हा वृंदाला हे समजले तेव्हा तिने विष्णूंना प्रश्न केला की तुमची जन्मभर पुजा, तपस्या केली तर तू माझ्यासोबत असे का केले. पण या प्रश्नाचे उत्तर विष्णू ने दिले नाही. त्यावेळी वृंदा रागावून विष्णूला शाप देते की तुम्ही पाषाण व्हाल. पण तिला अनेक प्रार्थना करतात आणि शाप मागे घ्याला सांगतात. तेव्हा ती शांत होऊन शाप मागे घेते आणि विष्णूंना शाप मधून मुक्त करते. आणि ती जालंदरासोबत सती गेली. आणि वृंदाच्या राखेतून एक झाड बनवून बाहेर आली. त्यावेळी विष्णूने त्या झाडाचे नाव तुळशी असे ठेवले असते. आणि तिला असे वरदान दिले असते की तुळशीशिवाय मी कोणत्याही प्रकारचा प्रसाद ग्रहण करणार नाही. तेव्हा पासून तुळशी विवाह चालू होतो. आणि या दिवशी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे घालून ऊस , बोरे हा प्रसाद वाटला जातो.

हे ही वाचा : 

Diwali 2022 : दिवाळीत बनवा घरच्या घरी स्वादिष्ट सोनपापडी

 

 

Latest Posts

Don't Miss