Diwali 2022 : बलिप्रतिपदा हा दिवस का साजरा केला जातो ?

Diwali 2022 : बलिप्रतिपदा हा दिवस का साजरा केला जातो ?

दिवाळी (Diwali 2022) हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी हा सण भारतात आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीतील महत्वाचा सण म्हणजे बलिप्रतिपदा (Balipratipada 2022) होय. बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा करायची प्रथा आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी बलिप्रतिपदा या पूजेला देखील महत्व आहे. तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमधून बलिप्रतिपदा याची कथा सांगणार आहोत.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस, जाणून घ्या प्रथा

 

बलिप्रतिपदा हा सण का साजरा केला जातो –

बलिप्रतिपदा हा दिवाळीचा चवथा दिवस म्हणून साजरा केला जातो. बलिप्रतिपदेला बळिराजा हा शेतकरी राजा होता. हा सण मुळात कृषी संस्कृतीतून आलेला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा केली जाते. बलिप्रतिपदा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. हा सण हिंदू लोकांचा मोठा सण आहे. या दिवशी बळीराजाची रांगोळी काढली जाते. आणि त्याची पूजा केली जाते. “इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो” असे देखील म्हणतात.

बलिप्रतिपदा या सणाची कथा –

बळी हा शेतकरीचा राजा होता. तो प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता. त्यामुळे तो आता देवांपेक्षाही मोठा झाला आहे. या दिवशी शेणाचा बळीराजा करण्याची अजूनही प्रथा आहे. बलिप्रतेच्या कथेनुसार पार्वतीने महादेवांना या दिवशी युद खेळात हरवले म्हणून हा दिवस साजरा केला जातो असे देखील म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती . बळीराजा हा दानशूर म्हणून देखील ओळखला जात होता. बळीराने त्याच्या वाढत्या शक्तीमुळे देवांचा देखील पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केले होते. त्या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा चालू केली होती. विष्णूंनी वामन आवतार धारण केले होते. आणि त्या अवतारामध्ये त्यांनी त्रिपाद तीन पावले भूमी इतकी जमीन मागितली. वाचनाला बांधून असल्याने त्यांनी हे दान दिले. आणि वामन अवतार घेऊन विष्णूंनी प्रचंड रूप धरून करून पूर्ण पृथ्वी व्यापली. तिसरे पाऊल ठेवल्यास आणि जागा न शिल्क राहल्यास वचनासाठी बळीराजानें डोके पुढे ठेवले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून त्याला पाताळात धाडले. आणि बळीराजाने धाडण्यापूर्वी वचन मागितले की तुझी जी ईच्छा असेल ती पूर्ण करण्यात येईल असे वामन विष्णूंनी त्याला वरदान दिले की कार्तिकी प्रतिपदेला तुझी दानशूर म्हणून पूजा केली जाईल. आणि “इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो” असे म्हटले जाईल.

हे ही वाचा :

Diwali 2022 : जाणुन घ्या लक्ष्मी पूजनचे महत्त्व, आणि पूजा विधी

 

Exit mobile version