spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : द्या लक्ष्मी पूजनच्या शुभेच्छा…

दिवाळी (Diwali) या सणाला सुरुवात झाली आहे. तसेच दिवाळीत भरपूर प्रमाणात फराळ खायाला मिळतात. दिवाळी हा असा सण आहे की या सणामध्ये पाच सण साजरे करायला मिळतात. यावेळी लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी एकाच वेळी आले आहे. लक्ष्मी पूजन हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात सोने, चांदीचे दागिने, धातू पैशांची देखील पूजा केली जाते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून लक्ष्मी पूजनच्या शुभेच्छा बद्दल सांगणार आहोत.

हे ही वाचा :  Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीला घर सजवा ‘या’ खास दिव्यांनी

 

लक्ष्मीपूजन यावेळी २४ ऑक्टोबर २०२२ रोजी आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजन केल्यास घरात लक्ष्मीचा वावर राहतो. आणि सुख समृद्धी नांदते. लक्ष्मी पूजनच्या दिवशी दागिन्यांची, झाडूची , पुस्तके , धातू यांची देखील पूजा केली जाते. सायंकाळी ६ वाजून ते ८. ३८ पर्यंत पूजेचा मुहूर्त आहे. लक्ष्मीपूजन चा दिवशी एकमेकांना फराळासाठी आमंत्रण केले जाते.

दिवाळीच्या पणतीने, घराच्या दाही दिशा चमकतील,
लक्ष्मी पूजनच्या आणि दिपालीवालीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।।

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो।।

लक्ष्मीचा सदैव तुमच्या घरात वावर राहो,
तुमच्या घरात सुख समृद्धी नांदतो, हीच ईश्वरचरणी प्राथना,
लक्ष्मीपूजनच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा।।

लक्ष्मी आली सोनपावलांनी घरात,
धन-धान्यांच्या राशी भरल्या,
घरी नांदू दे सुख-समृद्धी,
लक्ष्मीपूजनच्या तुम्हाला मंगलमय शुभेच्छा।।

रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळु दे,
लक्ष्मीच्या पावलांनी,
घर सुख समदीने भरू दे,
लक्ष्मीपूजनच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा।।

दिवाळी निमित लक्ष्मीचे करून पूजन लावा दिवे,
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी,
लक्ष्मीपूजनच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा।।

आज आहे लक्ष्मीपूजनचा दिवस,
झळकाळात आहे कंदील,
महालक्ष्मीच्या आराधनेत वाहा सारे मगन,
होतील सर्व मनोकामना पूर्ण,
लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा।।

लक्ष्मी पूजन निमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवारास,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,सुख,भरभराट होऊदे,
तुमच्या सदैव इच्छा पूर्ण होऊदे,
लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा।।

हे ही वाचा : 

Vasubaras Diwali 2022 : दिवाळीचा पहिला दिवस; वसुबारसने झाली दिवाळीची सुरवात

 

Latest Posts

Don't Miss