Diwali सणाबद्दल या रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?

भारतात प्रामुख्याने साजरा केला जाणारा दिवाळी (Diwali 2022) हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Diwali सणाबद्दल या रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?

भारतात प्रामुख्याने साजरा केला जाणारा दिवाळी (Diwali 2022) हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हटलं की अगदी लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. दिवाळीसाठी साधारण महिन्याभरापासूनच बाजारपेठा सजल्या आहेत. आता काहींच्या घराघरामध्ये फराळाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली असणार तर काहींची शॉप्पिंगची लगबग ही सुरु असणार. पण तुम्हाला दिवाळी, या शब्दाचा अर्थ माहितीये का?

दिवाळीला बऱ्यादा दीपावली म्हणूनही संबोधलं जातं. या शब्दाचा संस्कृत भाषेतील अर्थ होतो, दिव्यांची रांग (row of lights). म्हणूनच दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध प्रकारच्या दिव्यांची आरास घराघरांमध्ये केली जाते. दिवाळी (Diwali) या सणाला दीपावली (Dipawali) असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. “दीप” म्हणजे “दिवा” आणि “आवली” म्हणजेच “ओळ”. याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना. अर्थात दिवाळी. दिवाळी या सणाला काही जण दिपवाळी (Dipwali) असे देखील म्हणतात. मात्र, दिवाळीचा शुद्ध शब्द हा “दीपावली” आहे. मुळात, दिवाळी या शब्दाचा प्रत्येक प्रांतात, भाषेत वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. पण अर्थ एकच आहे.

अनेकांनाच वाटतं की दिवाळी हा सण फक्त हिंदू साजरा करतात. पण, तसं नाहीये हा सण शीख आणि जैन समुदायातही साजरा केला जातो. दिवाळी दरवर्षी पाच दिवस साजरा केली जाते. हा सण दरवर्षी येत असला तरीही त्याची तारीख मात्र बदलते. चंद्राच्या स्थितीवर दिवाळीची तारीख ठरते. दिवाळीला लक्ष्मीची पूजा केली जाते. असं म्हणतात, की या दिवसांमध्ये दिवे यासाठी लावले जातात जेणेकरुन लक्ष्मीला (Laxmi pujan) सर्वांच्याच घरात जाण्यासाठी वाट सापडेल आणि प्रत्येकाच्याच घरात भरभराट नांदेल. बंगाल प्रांतात दिवाळीदरम्यान कालीमातेची पूजा केली जाते. अशी समजूत आहे की देवीच्या या रुपानं दिवाळीदरम्यान वाईटावर विजय मिळवला होता. भारताबाहेर, युनायटेड किंग्डम (UK) येथे असणाऱ्या leicester येथे मोठ्या प्रमाणात दिवाळीची धूम पाहायला मिळते. दरवर्षी इथे हजारोंच्या संख्येनं नागरिक एकत्र येत हा सण साजरा करतात.

हे ही वाचा : 

SHRIKANT SHINDE: व्हीआयपी कल्चर नकोय, रस्ता बंद करण्याचा आम्हाला अधिकार नाही

आजचे राशिभविष्य, २ नोव्हेंबर, २०२३, इतरांना दुखावू नका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version