Tuesday, October 1, 2024

Latest Posts

कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी मंदिराबद्दल या रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहे का ?

महाराष्ट्रामधील कोल्हापुरातील सुप्रसिद्ध असलेले श्री महालक्ष्मी मंदिर एक जागृत देवस्थान आणि करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. तसेच कोल्हापूरची श्री महालक्ष्मी माता ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध मंदिर आहे. कोल्हापूरची अंबाबाई म्हणून ओळखली जाणारी श्री महालक्ष्मी तिच्या भक्तांच्या हाकेला धावणारी आहे. महालक्ष्मी अंबाबाईचा उल्लेख पुराणामध्ये देखील सापडतो. तसेच महाराष्ट्रामधील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मुख्य शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची श्री अंबाबाई आहे.

कोल्हापूर शहराचं आणि अंबाबाई मंदिराचं नातं एकमेकांत गुंफलेलं आहे. कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख कधी अंबाबाई कधी महालक्ष्मी असा केला जातो. असे सांगितले जाते की, श्री महालक्ष्मी मातेची मूर्ती रत्नजडित खंड्यापासून घडविण्यात आली असून ती जवळपास पाच ते सहा हजार वर्षांपूर्वीची असावी. शारदीय नवरात्रीला कोल्हापूरमध्ये नवरात्र भव्य आणि दिव्या स्वरूपात साजरी होते. तसेच नवरात्रीमध्ये भक्त लाखोंच्या संख्येने कोल्हापुरात दाखल होऊन अंबाबाईचे दर्शन घेतात. वर्षातून दोनदा साजरा होणार ‘किरणोत्सव’ हा सोहाळा या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. इथे बरेच प्राचीन मंदिरे आहेत. कोकणाचा राजा कर्णदेव कोल्हापुरात आल्यावर हि मूर्ती एका लहानश्या मंदिरात होती. त्याने इथल्या मंदिराच्या परिसरातील स्वच्छता करवून मंदिराला व तेथील जागेला प्रकाशीत आणले. चालुक्य राजवटीत वास्तुशास्त्राच्या बांधणीनुसार मंदिराचे बांधकाम केले गेले. या महालक्ष्मी मंदिराला चक्क पाच कळस असून हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले. त्या जुन्या मंदिरातील खांबाला गरुड खांब म्हणतात.

पुराणानुसार आदिशक्तीची एकशे आठ ठिकाणी आहेत. त्यांच्यापैकीच करवीर क्षेत्रास विशेष महत्त्व आहे. या मंदिरामध्ये मनशांती बरोबर इच्छापूर्ती मिळते. त्यामुळे उत्तर काशीपेक्षा या ठिकाणास जास्त माहात्म्य आहे. असा अनेक भाविकांचा विश्वास आहे. श्री महालक्ष्मी व भगवान विष्णूंचे वास्तव्य करवीर भागामध्ये असल्याचे श्रद्धा आहे. महालक्ष्मी मंदिराच्या कोरीव कामामध्ये वेगवेगळे वेड मंत्र देखील कोरले आहेत. या देवीची मूर्ती वजनाला ४० किलोग्रॅमची आहे. ही मूर्ती घडताना हीरक नावाचा धातू मिसळला आहे. हे मंदिर चौकोनी दगडाच्या तुकड्यावर उभारले गेले आहे. या महालक्ष्मी मूर्तीला चार हात असून एका हातात ढाल तर दुसऱ्या हातामध्ये तलवार आहे. डाव्या हातात पानाचे ताट तर उजव्या हातामधे खालील बाजूस महाळुंग आहे आणि डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनागाची मूर्ती आहे.

Latest Posts

Don't Miss