Dussehra 2022 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे ‘दसरा’

Dussehra 2022 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे ‘दसरा’

Dussehra 2022 : विजयादशमी (Vijayadashami) म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला “दसरा” (Dussehra 2022) असेही म्हटले जाते. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. आणि दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार दासन्याच्या दिवशीच प्रभू रमणे लंकापती रावणाचा वध केला असता. याचे विजयाचे प्रतिक महणून रावणाच्या दरबारात जायचे. त्यसोबच कुंभकर्ण आणि पुत्र मेघनाद हे पुत्राचे दहन पाहण्यासाठी जात असत. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.

हे ही वाचा : Navratri 2022 : नवरात्रीमध्ये मांढरदेवीची (काळूबाई) उपासना ठरते लाभदायक

 

श्रीरामाने विजया दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले अशीही आख्यायिका आढळून येते. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते. त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून औक्षण केले जाते. विजयादशमीच्या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात. ही पाने पित्त आणि कफ दोषांवर गुणकारी आहेत.

दसऱ्याला शेतीतील पहिले पीक वाजतगाजत घरी आणून आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आजही गावोगावी पाळली जाते. ह्या नव्या धान्याच्या काही लोंब्या, झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांनी बनविलेल्या तोरणात बांधतात. हे सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते. ह्या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितादेवीची पूजा आणि शस्त्रपूजा हे चार विधी पूर्वी राजे रजवाडे, सरदार करीत असत.

 

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. नवी वाहने, वस्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी होते. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. दसऱ्याला (Dussehra) एकमेकांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून देतो.

दसरा 2022 तारीख आणि शुभ दिवस

विजयादशमी (दसरा) – 5 ऑक्टोबर 2022, बुधवार
दशमी तारीख प्रारंभ – 4 ऑक्टोबर 2022 दुपारी 2.20 वाजेपासून
दशमीची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2022 रात्री 12 वाजेपर्यंत
विजय मुहूर्त – 5 ऑक्टोबर दुपारी 02:07 ते 2:54 पर्यंत
वेळ कालावधी – 0 ते 47 मिनिटे
अमृत ​​काल – 5 ऑक्टोबर सकली 11.33 ते दुपारी 1:2 पर्यंत
दुर्मुहूर्त – 5 ऑक्टोबर, 11:51 ते 12:38 पर्यंत.

हे ही वाचा :

टेंभी नाका देवीच्या आरतीचा मान कोणाला?

Exit mobile version