शेतकऱ्यांच्या साथीदाराचा दिवस म्हणजेच बैल पोळा

मराठी दिनदर्शिकेप्रमाणे श्रावण महिन्यातील शेवटचा सण म्हणून बैल पोळा या सणाला ओळखले जाते. हिंदू धर्मात निसर्ग आणि प्राण्यांवर प्रेम करायला शिकवले जाते, कृतज्ञता व्यक्त करणे शिकवले जाते,

शेतकऱ्यांच्या साथीदाराचा दिवस म्हणजेच बैल पोळा

मराठी दिनदर्शिकेप्रमाणे श्रावण महिन्यातील शेवटचा सण म्हणून बैल पोळा या सणाला ओळखले जाते. हिंदू धर्मात निसर्ग आणि प्राण्यांवर प्रेम करायला शिकवले जाते, कृतज्ञता व्यक्त करणे शिकवले जाते, वटपौर्णिमा असो नागपंचमी असो किंवा बैलपोळा असो… शेतकऱ्यांचा प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा आणि वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो.

वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण अर्थात पोळा दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, दोन वर्षानंतर सर्व सण उत्सव उत्साहात साजरे केले जात आहे. त्याचप्रमाणे पोळा हा सण देखील यावर्षी मोठ्या उत्सहात साजरा केला जाईल. श्रावणातील प्रत्येक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांना धार्मिक महत्त्व आहे, तसे ते शास्त्रीय, व्यवहारिक, नैसर्गिक, कृषी यादृष्टिने ते महत्त्वाचे आहेत. श्रावण महिन्यातील अमावास्येला बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्याची पद्धत आहे

यंदाच्या वर्षी शुक्रवार, दि. २६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात हा सण साजरा केला जात आहे. याच दिवशी दर्श अमावस्या आणि श्रावणातला शेवटचा शुक्रवार आहे. यामुळे या दिवसाला अधिक महत्व प्राप्त होत आहे. श्रावणी अमावास्येच्या दिवशी शेतकरीवर्ग पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. प्रदेशपरत्वे हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी किंवा श्रावण अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा करतात. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र, परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा भिन्न असतात. या सणाचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.

बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करतात. या दिवशी बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात. बैलपोळा सण प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात शेतकरी वर्ग साजरा करतात.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमांध्र भागात देखील पोळा साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीच्या बैलांची पूजा करतात. तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या म्हटले जाते. तर काही ठिकाणी बेंदूर असे देखील म्हणतात. मध्य आणि पूर्व महाराष्ट्रातील मराठी लोकांमध्ये प्रामुख्याने हा सण साजरा केला जातो. भारतात इतर काही ठिकाण देखील पोळा साजरा केला जातो. दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात दर्श अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो.

हे ही वाचा :-

गणेशोत्सवात बेस्ट बसकडून प्रवाशांसाठी खास सुविधा, जाणून घ्या सविस्तर माहिती

‘गॉडफादर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version