नवरात्रौत्सवात उपवास करताय ? मग कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात हे जाणून घ्या…

नवरात्रौत्सवात उपवास करताय ? मग कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात हे जाणून घ्या…

काहीच दिवसांत आता नवरात्रौत्सवाला सुरुवात होईल. नवरात्रौत्सव देखील सगळीकडे उत्साहात साजरा केला जातो. या दिवसांमध्ये अनेकजण व्रतस्थ असतात. या नऊ रात्रीच्या कालावधीत हिंदू धर्मीय लोक दुर्गा देवीची मनोभावे पूजा-अर्चा व सेवा करतात. वेगवेगळ्या पद्धतीत लोक उपवास करतात. सर्वजण आपापल्या श्रद्धेनुसार हे उपवास करतात. काही जण हा पहिल्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी उपवास करतात. तर काही नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात. काही लोक केवळ दूध आणि फळे यांचा आहार घेतात. परंतु बऱ्याच जणांना उपवासाच्या दरम्यान काय खावे किंवा काय खाऊ नये याबाबत माहित नसते. म्हणून आपण जाणून घेऊयात सविस्तर उपवासाच्या दिवसांत कोणत्या गोष्टींचे सेवन करावे व कोणत्या गोष्टी टाळाव्यात.

उपवासाच्या दिवशी अनेक उपवासाचे पदार्थ बनवले जातात. त्यात साबुदाणा वडा, शिंगाड्याच्या पिठाच्या पुऱ्या किंवा पकोडे, साबुदाणा खिचडी इत्यादींचा समावेश असतो. परंतु उपवासाच्या दिवशी ज्या पदार्थामुळे शरीरात शक्ती आणि ऊर्जा टिकून राहील असे पदार्थ खाणे गरजेचे आहे. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे नारळ पाणी, दूध, बदाम, विविध फळांचे ज्यूस यांचा समावेश करावा. त्याचसोबत दही, केळ्याचा मिल्कशेक, बटाटा, पालक, रताळं, टोमॅटो, गाजर, बीट, वरईचे पदार्थ, ताक, सरबत, नारळाचे पदार्थ, साबुदाण्याचे पापड, राजगिरा लाडू, अश्या विविध पदार्थांचा समावेश करू शकता.

तसेच तुम्ही नवरात्रीच्या उपवासात गहू, तांदूळ, बेसन, कॉर्नफ्लॉवर, रवा, शेंगा, मसूर, नाचणी, बाजरी, ज्वारी, कांदा, लसूण, जिरा पावडर, हळद, पांढरे मीठ, कोथिंबीर यांसारख्या गोष्टींचे सेवन करू नका. उपवासादरम्यान पांढऱ्या मिठाचे सेवन करू नका त्याऐवजी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता. तसेच उपवासाच्या दरम्यान मासे किंवा अंडी यांसारख्या मांसाहारी पदार्थांपासून दूर राहा. त्याचबरोबर फास्टफूड, स्मोकिंग किंवा दारूचे सेवन करू नका.

Exit mobile version