Monday, July 8, 2024

Latest Posts

July 2024: जुलै महिन्यात येणार ‘हे’ सण, जाणून घ्या महत्त्व

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक विविधता असल्यामुळे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण-उत्सव, व्रत वैकल्ये येत असतात. जुलै महिन्याची सुरुवात महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठलाच्या उत्सवाने म्हणजेच आषाढी एकादशीने  होणार आहे. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे जुलै महिना हा वर्षातील सातवा महिना आहे. जुलै महिना सण-उत्सव आणि उपवासाच्या दृष्टीने खूप महत्वाचा मानला जातो. त्यात जुलै महिन्यात आषाढ महिन्याला देखील सुरुवात होत आहे. या जुलै महिन्यात आषाढ मासारंभापासून अनेक मोठे सण साजरे केले जाणार आहेत. या महिन्यात विनायक चतुर्थी, दुर्गाष्टमी, गुरुपौर्णिमा, कामिका एकादशी प्रदोष व्रत असे विविध सण आहेत. या महिन्याच्या अखेरीस संकष्टी चतुर्थी देखील आहे. आषाढ महिना आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो.

आषाढ महिना हा असा महिना मानला जातो ज्यामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे या महिन्यात पौराणिक महत्व असलेल्या मंदिरे आणि प्राचीन तीर्थक्षेत्रांना भेट दिली जाते. आषाढ महिन्यातील देवस्थानी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात. श्री हरीची उपासना केल्याने व्यक्तीची विचार प्रक्रिया शुद्ध होते आणि त्यांचे जीवन आनंदाने भरते. त्याच वेळी आषाढ महिन्यात गुप्त नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा केल्याने लोकांच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. जुलै महिन्यात येणारे काही महत्वाचे सण आणि त्याचे महत्व जाणून घेऊया.

जुलै २०२४ महिन्यातील महत्वाचे सण:

  • २ जुलै २०२४- योगिनी एकादशी
  • ३ जुलै २०२४- प्रदोष व्रत
  • ५ जुलै २०२४- ज्येष्ठ अमावस्या
  • ६ जुलै २०२४- आषाढ मासारंभ
  • ८ जूलै २०२४- मुस्लिम मोहरम मासारंभ
  • ९ जुलै २०२४- विनायक चतुर्थी (अंगारक योग)
  • १४ जुलै २०२४- दुर्गाष्टमी
  • १७ जुलै २०२४- देवशयनी आषाढी एकादशी, मोहरम
  • १९ जुलै २०२४- प्रदोष व्रत
  • २० जुलै २०२४- पौर्णिमा प्रारंभ, साईबाबा उत्सव प्रारंभ शिर्डी
  • २१ जुलै २०२४- गुरुपौर्णिमा
  • २२ जुलै २०२४- साईबाबा उत्सव समाप्ती शिर्डी
  • २४ जुलै २०२४- संकष्टी चतुर्थी
  • ३१ जुलै २०२४- कामिका एकादशी

१७ जुलै २०२४ (देवशयनी आषाढी एकादशी)- ‘आषाढी एकादशी’ ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुपारी आणि रात्री भोजनात उपवासाचे विशेष पदार्थांचे सेवन केले जाते.

२१ जुलै २०२४ (गुरुपौर्णिमा)– आषाढ महिन्यातील ‘गुरुपौर्णिमा’ हा हिंदू धर्मातील वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे. दिनदर्शिकेप्रमाणे आषाढ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. अध्यात्मिक गुरु श्रीमद राजचंद्र याना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या उत्सवाचे पुनरुज्जीवन केले. या दिवसाला ‘व्यासपौर्णिमा’ किंवा ‘गुरुपौर्णिमा’ असेही म्हणतात. हा दिवस गुरु-शिष्य परंपरेला समर्पित केला जातो.

हे ही वाचा:

Sanjay Raut यांचा घणाघात, या देशाचा पंतप्रधानच मोठा बुवा, साधकांच्या मृत्यूला…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss