मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीच्या व्रताचे खास  महत्व,जाणुन घ्या महालक्ष्मीच्या पूजेची पद्धत आणि महत्तव

मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीच्या व्रताचे खास  महत्व,जाणुन घ्या महालक्ष्मीच्या पूजेची पद्धत आणि महत्तव

मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीच्या व्रताचे खास  महत्व,जाणुन घ्या महालक्ष्मीच्या पूजेची पद्धत आणि महत्तव

मार्गशीर्ष महिन्याला खास महत्व आहे. हा महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे. श्रीकृष्णासोबत हा महिना देवी महालक्ष्मीला ही समर्पित आहे. या महिन्यात मात लक्ष्मीची आवर्जून पूजा केली जाते. महाराष्ट्रात या वर्षी १३ डिसेंबरला म्हणजे उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ होत आहे.

मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यावर, प्रत्येक गुरूवारी महिला देवी महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरूवारी केले जाते. या महिन्यातील पहिला गुरूवार हा १४ डिसेंबरला आहे. या महिन्यात केल्या जाणाऱ्या देवी महालक्ष्मीच्या व्रताला अनन्यसाधारण असे महत्व आहे. हिंदू धर्मामध्ये महालक्ष्मीच्या या व्रताचे आणि मार्गशीर्ष महिन्याचे खास असे महत्व आहे. या महिन्यात मांसाहार देखील केला जात नाही. या महिन्यातील प्रत्येक गुरूवारी या व्रताचे उद्यापन केले जाते आणि उपवास केले जातात.

यंदा हा मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरूवार कधी आहे? आणि महालक्ष्मीच्या व्रताची पूजा पद्धत आणि महत्व आपण जाणून घेणार आहोत.

यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरूवार कधी ?

या वर्षी महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात ही १३ डिसेंबरपासून होणार आहे. १२ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी अमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात होईल. ही अमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात होईल.

१३ डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात झाल्यानंतर हा मार्गशीर्ष महिना ११ जानेवारीला सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांनी संपणार आहे. या महिन्यात ४ गुरूवार असणार आहेत. या चार गुरूवारी महिला आवर्जून महालक्ष्मीव्रताचे उद्यापन करतात आणि उपवास करतात.

मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारच्या व्रताच्या तारखा खालीलप्रमाणे :

महालक्ष्मी व्रताचे महत्व

मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीच्या व्रताचे खास असे महत्व आहे. या महिन्यातील प्रत्येक गुरूवारी महालक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन केले जाते. या दिवशी महालक्ष्मीची प्रतिकात्मक स्वरूपात पूजा मांडली जाते. कलशाची मांडणी करून महालक्ष्मीच्या व्रताची कथा वाचली जाते. देवीला नैवेद्य दाखवला जातो.

या दिवशी महिला दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी उपवास सोडतात. त्यानंतर, शेवटच्या गुरूवारी महिला हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून सूहासिनी महिलांना आमंत्रित करतात आणि एकमेकींना वाण देतात.

महालक्ष्मीचे हे व्रत केल्याने घरात सूख-शांती, ऐश्वर्य आणि समृद्धी येते, अशी मान्यता आहे. त्यामुळे, या व्रताला आणि महालक्ष्मीच्या पूजेला फार महत्व आहे. हे व्रत केल्याने देवीची कृपा राहते आणि जीवनातील संकटे दूर होतात असे ही म्हटले जाते.

महालक्ष्मीच्या व्रताची अशी करा पूजा

हे ही वाचा:

Exit mobile version