गणेश चतुर्थीनिमित्त पूजा विधी, व्रत विधी आणि विशेष मंत्र जाणून घ्या महत्वाची माहिती

गणेश चतुर्थीनिमित्त पूजा विधी, व्रत विधी आणि विशेष मंत्र जाणून घ्या महत्वाची माहिती

आपला सर्वांचा आवडता सण गणेश उत्सवाला अवघा एक आठवडा बाकी आहे. ‘विनायक चतुर्थी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सणाला एक विशेष महत्त्व असून यानिमित्ताने संपूर्ण भारतात एक भव्य उत्सव साजरा केला जातो. नावावरुन कळते की, हा सण गणपतीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. भगवान शिव आणि देवी पार्वतीचा मुलगा भगवान गणेश यांचा जन्म या दिवशी झाला होता. गणेश चतुर्थी दिनी प्रात:स्नान-संध्या पूजादी नित्यविधी करावेत. मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत पाट मांडवा, अक्षता पसराव्यात. यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन, प्राणायाम आदी केल्यावर ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावे.

त्याचबरोबर कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं. गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र म्हणावेत.

ऊं एकदंताय विधामहे, वक्रतुंडाय धिमही, तन्नो दंति प्रचोदयात्

ऊं वक्रतुंडायक नृत्यस्त्रय क्लिंग हिंग श्रृंग गण गणपतये वर वरदा सर्वजनं मे वाशमनय स्वाहा

वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभः निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा

त्यानंतर मोदक आणि इतर नैवेद्य दररोज अर्पण केले जातात कारण मोदक गणपतीला खूप प्रिय आहे. – प्रसाद सर्वांमध्ये वाटला जातो. जेथे सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मूर्ती बसवल्या जातात, तेथे विशाल विस्तारित देखावे केले जातात. लोक आदराने आणि उत्साहाने हे देखावे पहायला येतात. गणपतीची दररोज पूजा केली जाते आणि भोग दिला जातो. दहा दिवसांनंतर विसर्जन मिरवणूक भव्यतेने काढली जाते.

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

हेही वाचा : 

यंदा संजय राऊत यांचा गणेशोत्सव तुरुंगात!

Exit mobile version