spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024 : मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाचा सोन्या, चांदीने मढलेला गणपती पाहिलात का ? जाणून घेऊयात त्याची खास वैशिष्टय

Ganeshotsav 2024 : मुंबईत जागोजागी लहान मोठे गणपती मंडळ असतात जे फार उत्साहात गणपती बाप्पाची स्थापना करतात. बरीचशी गणपती मंडळ प्रसिद्ध आहेत. त्यातीलच गणेश गल्ली मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, अंधेरीचा राजा, खेतवाडीचा राजा, गिरगावचा राजा अशीच काही गणपती मंडळ सर्वाधिक ओळखली जातात. त्याचपैकी एक गणपती मंडळ म्हणजे मुंबईतील वडाळा जीएसबी सेवा गणपती मंडळ. हा मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो. गणपतीच्या अंगावरील सर्व दागिने हे सोन्याचे असतात.

येथील खास वैशिष्टय म्हणजे येथील प्रथा, परंपरा आणि विधी. किंग संर्कलच्या जी.एस.बी. गणपती सेवा मंडळाने (GSB Seva Mandal) यावर्षी नविन विक्रम केला आहे. जी.एस.बी. गणपती सेवा मंडळाने तब्बल ४०० कोटी रुपयांचा विमा काढला आहे. गणेश भक्त मोठ्या संख्येने या गणपतीच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात. भाविकांची होणारी गर्दी आणि गणपती बाप्पाच्या अंगावरील सोन्याचे दागिने या सर्वांचा विचार करताच जी.एस.बी. गणपती सेवा मंडळाने विमा रक्कमेत वाढ केली.

मुंबईतील वडाळा जीएसबी सेवा मंडळाचा गणपती आता भक्तांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून सगळीकडे प्रसिद्ध होत आहे, असे मंडळाचे प्रवक्ते अमित पै यांनी सांगितले आहे. जीएसबी. गणपती सेवा मंडळाचे अध्यक्ष आणि प्रवक्ते अमित पै यांनी दिलेल्या माहितीवरून, यावर्षी जी.एस.बी. गणपतीसाठी ४०० कोटी ५८ लाखांचा विमा काढण्यात आला आहे. या गणपतीला तब्बल ६६ किलोपेक्षा जास्त किंमतीचे दागिने घालण्यात येतील. तसेच ३२५ किलोपेक्षा चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंनी गणेश मूर्ती सजवण्यात येईल.

वर्षागणिक जी.एस.बी. गणपती मंडळाला दर्शनास येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतच आहे. दर्शनाला येणारे भाविक महाप्रसादाचाही लाभ अवश्य घेतात. त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास आणि असुविधा येऊ नयेत यासाठी मंडळाकडून स्वयंसेवक सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

जयदीप आपटेला अटक होण्याआधीच त्याच्या जामिनाची तयारी ८ दिवसापासून सुरू होती, संजय राऊत यांचा हल्लाबोल

Jaydeep Apate Arrest: असा पकडला जयदीप आपटेला… कल्याणच्या डीसीपी यांनी सांगितला थरार

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss