Ganeshotsav 2024 : गणपती बाप्पाच्या पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची करा आजच यादी; जाणून घ्या यादी…

Ganeshotsav 2024 : गणपती बाप्पाच्या पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची करा आजच यादी; जाणून घ्या यादी…

Ganeshotsav 2024 : मुंबईसह आजूबाजूच्या शहरांमध्ये गणेशोत्सवाची धामधूम सुरु झालेली पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. बाप्पाच्या पूजेची आणि स्वागताची तयारी सगळीकडे सुरु झाली आहे. गणेश उत्सव हा देशभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झालेले असतात. काहींच्या घरी दीड तर काहींच्या घरी दहा दिवस गणपती बाप्पाचे पूजन केले जाते.

प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाला वंदन करून केली जाते. त्याला ‘श्रीगणेशा’ करणे असेही म्हणतात. गणपती बाप्पाच्या पूजेने कार्याची सुरुवात केल्यास यश प्राप्त होते अशी सर्वांचीच श्रद्धा आहे. कारण गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, मनापासून प्रार्थना केल्यास आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. गणपतीच्या विधिवत पूजेसाठी सर्व साहित्य वेळेवर उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठीच पूजेसाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात.

गणपती बाप्पाच्या पूजेसाठी आवश्यक असणारे साहित्य: (Ganesh Pooja Sahitya List)
१) समई
२) हळदी कुंकू
३) चौरंग,पाट
४) बसण्यासाठी आसन
५) तांब्याचा तांब्या
६) ताम्हण ,कलश
७) पळी आणि पंचपात्र
८) घंटा
९) शंख
१०) निरांजन
११) अगरबत्तीचं घर
१२) कापसाच्या वाती, फुलवाती
१३) निरांजन, समईत घालायला तेल किंवा तूप
१४) सुट्टे पैसे
१५) नैवेद्यासाठी मोदक, खिरापत, खडीसाखर,
१६) पंचखाद्य
१७) नारळ, लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड
१८) विड्याची पानं
१९) पूजा तीर्थासाठी दही,दूध,तूप,मध आणि साखर
२०) पाच फळं
२१) फुलं, दुर्वांच्या २१ जुड्या , बेल, शमीपत्र,वस्त्रमाळ, पत्री
२२) आंब्याच्या झाडाची पाने
२३) बाप्पाच्या गळ्यात घालण्यासाठी कंठी, हार
२४) गुळाचा खडा आणि सुख्या खोबऱ्याची वाटी
२५) जानवी जोड
२६) अष्टगंध,शेंदूर,अक्षता,रांगोळी, अत्तर, चंदन
२७) धूप , अगरबत्ती , कपूर
२८) सुपाऱ्या
२९) हळकुंड, खारीक,बदाम, अक्रोड
३०) काडीपेटी

हे ही वाचा:

कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

Sharad Pawar माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागलेत?: Hasan Mushrif

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version