spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवात बाप्पाच्या पूजेनंतर ‘हे’ खास पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवा…

गणेशोत्सव सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सगळीकडेच जल्लोष आणि आनंदी वातावरण पाहायला मिळते. घरोघरी आणि बऱ्याच सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. या दिवसांमध्ये गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच नैवेद्यासाठी बऱ्याच प्रकारचे गोडाचे पदार्थ बनवले जातात. तुम्हालाही जर लाडक्या बाप्पासाठी विविध गोड पदार्थ बनवायचे असतील तर असे काही पदार्थ तुम्ही नक्की बनवून पहा.

मोदक (Modak)
मोदक म्हणजे गणपती बाप्पांचा सर्वांत जास्त आवडता पदार्थ आहे. मोदक तुम्ही तळून किंवा उकडीचे सुद्धा करू शकता. मोदकांसाठी तांदळाचे पीठ, गूळ, वेलची, तूप, नारळ यांपासून बनवला जातो. असे म्हंटले जाते, जेव्हा गणपती बाप्पाचा दात तुटला होता तेव्हा बाप्पाला मऊसूद मोदक खायला दिले होते. मोदक बनवण्याची अनेकांनी वेगवेगळी पद्धत असते. परंतु सर्वजण एकच लक्षात ठेवतात की, बनवले जाणारे मोदक हे मऊ होतील याची विशेष काळजी घेतात.

लाडू (Laadu)
आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे लाडू बनवले जातात. नैवेद्यामध्ये आपण गणपती बाप्पाला लाडू सुद्धा अर्पण करू शकतो. आपण बुंदीचे लाडू, मोतीचूर लाडू, बेसनाचे लाडू, तिळाचे लाडू, नारळाचे लाडू, रव्याचे लाडू, ड्रायफ्रूट लाडू बाप्पाला नैवेद्यात अर्पण करू शकतो. बऱ्याच ठिकाणी नैवेद्य म्हणून लाडू दाखवले जातात. लाडू हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडते असतात.

पाणी आणि नारळ (Water and Coconut)
नारळ हा सर्व शुभ ठिकाणी पवित्र मानला जातो. कोणत्याही कार्याची शुभ सुरुवात ही नारळ फोडण्यापासूनच केली जाते. पूजेच्या वेळी नारळ फोडून नारळाचे तुकडे सर्वांना प्रसाद म्हणून दिले जातात.

रसकदम (Raskadam)
हा पदार्थ रसगुल्ल्यासारखाच असतो. हा जरी बंगाली पदार्थ असला तरी सुद्धा तो गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. रसकदम या पदार्थावर खव्याचा किंवा माव्याचा थर लावून झाकलेला असतो. वरच्या भागात खसखस लावलेली असते.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss