spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024 : गैरसोय टाळण्यासाठी गणपतीच्या बाप्पाच्या पूजेला लागणारे साहित्य आधीच गोळा करून ठेवा; वाचा यादी

Ganeshotsav 2024 : यावर्षी ७ सप्टेंबर रोजी गणपती उत्सवाला सुरुवात होणार आहे. सर्व गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची अतिशय उत्सुकता लागून राहिली आहे. सर्वत्र ढोल ताशांच्या गजरात ७ सेप्टेंबरला घराघरांत गणपती बाप्पाचे आगमन होईल. या उत्सवात गणरायाची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. या गणेशोत्सवामुळे बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी लोटली आहे. देवाचे साहित्य, मूर्ती, सजावटीचे साहित्य, मिठाई यांची दुकाने गजबजलेली पाहायला मिळत आहेत.

सकाळ संध्याकाळ बाप्पाच्या होणाऱ्या सेवेसाठी आणि आरतीच्या वेळी अनेक वस्तूंची गरज असते. परंतु नेमक्या पूजेच्या वेळी एखादी गोष्ट सापडत नाही आणि शोधताना अगदी धांदल होऊन जाते. त्यामुळेच आयत्यावेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक असणाऱ्या वस्तूंची यादी बनवणे गरजेचे आहे. म्हणजे त्या यादीनुसार कोणती गोष्ट घेतली आणि कोणती नाही याची खात्री बाळगता येते.

गणरायाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य :

सर्वप्रथम दारात आणि बाप्पा समोर रांगोळी काढण्यासाठी एका डब्ब्यात रांगोळीचे रंग भरून ठेवावे. त्यानंतर हळदी-कुंकु एका भांड्यात काढून घ्यावे. तूपाचा डब्बा आणि तेलाची बाटली आधीच भरून ठेवावी जेणेकरून निरांजन लावायच्या वेळीस सोपे पडेल. तसेच पूजेसाठी लागणारे देवाची भांडी, पाट, चौरंग, आणि आसनही तयार करून ठेवावे. देवाच्या पूजेसाठी लागणारी भांडी स्वच्छ घासून घेऊन चकचकीत करावी. अगरबत्ती, धूप आणि धुपाच्या काड्या ज्या घरात प्रसन्न वातावरण निर्माण करतात त्या एकाच जागी डब्ब्यात भरून ठेवाव्यात म्हणजे आयत्या वेळी शोधाशोध नको. तसेच गुलाल, अक्षता आणि अष्टगंध एका ट्रे मध्ये काढून घ्यावे. त्याचप्रमाणे निरांजने, समई, कापुरदाणी, जानवी, सुपाऱ्या, कापसाची वस्त्र, तेलवाती, देवाला लागणारी मऊ सुती वस्त्र, फुलवाती असे सर्व सामान एका ठिकाणीच ठेवून द्यावे. अश्या पद्धतीने सर्व पूजा आणि विधींसाठी लागणारे साहित्य व्यवस्थित एकत्र ठेवावे म्हणजे वेळीच सापडेल.

हे ही वाचा:

जयदीप आपटेला अटक होण्याआधीच त्याच्या जामिनाची तयारी ८ दिवसापासून सुरू होती, संजय राऊत यांचा हल्लाबोल

Aaditya Thackeray यांनी दौरा जाहीर केल्यावर सर्वांना जाग, राज्याला कृषी मंत्री आहे की नाही? Sanjay Raut यांचा सवाल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss