spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024 : गणपती उत्सवात मूर्तीची प्रतिष्ठापना केव्हा करावी ? जाणून घ्या पूजा,वेळ, मंत्र आणि गौरी पूजनाचा दिवस…

Ganeshotsav 2024 : ७ सप्टेंबर पासून गणपती उत्सवाला सुरुवात होणार आहे. आपल्याकडे सर्व शुभ कार्यांची सुरुवात ही गणपती बाप्पाला वंदन करून म्हणजेच ‘श्रीगणेशा’ करूनच केली जाते. त्यासाठी कोणत्याही शुभ मुहूर्ताची गरज नाही. गणपती पूजन हे कोणत्याही वेळी शुभच असते. यावर्षी गणपती उत्सवात मूर्तीची स्थापना आपल्याला ब्राह्ममुहूर्तापासून कधीही करता येणार आहे. ब्राह्ममुहूर्तापासून ते मध्यान्हापर्यंत करता येणार आहे. परंतु सार्वजनिक गणपतीची स्थापना दिवसात कोणत्याही वेळी करता येऊ शकणार आहे.

प्रत्येकालाच अनंत चतुर्थी पर्यंत गणपती पूजन करणे शक्य नसते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार तितके दिवस गणपती पूजन करतात. त्यामुळे काही लोकांकडे दीड, पाच, सात किंवा दहा दिवसाचा गणपती विसर्जन होते. काही जणांकडे गौरी गणपती विसर्जनाची प्रथा असते त्यामुळे तेव्हा विसर्जन करताना त्यादिवशी कोणता वार आणि कितवा दिवस आहे असे काही पहिले जात नाही.

गणपतीची पूजा आणि मंत्र (Ganesha Worship and Mantras)

बऱ्याच घरी गणपती मूर्ती आधीच आणून ठेवली जाते तर काही घरी गणेश चतुर्थीच्या दिवशीच मूर्ती आणून स्थापना करून पूजा केली जाते. गणपतीची मूर्ती ही शक्यतो एक ते दीड फूट इतकीच असावी. काही ठिकाणी गणपतीच्या मुर्तीची पूजा करण्याऐवजी सुपारी किंवा नारळ ठेवून पूजा करण्याची प्रथा असते. सुपारीच्या गणपतीची पूजा करून , ”कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्न त्वयि धारती । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणी सुरनायक ।। (हे विघ्नहर्ता गणपती, तू प्रसन्न होऊन माझे कार्य सिद्धीस जावो. तसेच सर्व विघ्नांचा नाश होवो) हा मंत्र म्हणावा.

गौरी पूजन-विसर्जन केव्हा आहे? (When is Gauri Puja-Visarjan?)

१० सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर रात्री ८ वाजून ०४ मिनिटांपर्यंत गौरी आवाहन करता येणार आहे. तसेच ११ सप्टेंबर ज्येष्ठा नक्षत्र दिवशी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे. गुरुवारी १२ सप्टेंबरला रात्री ९ वाजून ५३ मिनिटांपर्यंत गौरी विसर्जन करता येईल.

हे ही वाचा:

जयदीप आपटेला अटक होण्याआधीच त्याच्या जामिनाची तयारी ८ दिवसापासून सुरू होती, संजय राऊत यांचा हल्लाबोल

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये वाढ, CM Shinde यांची घोषणा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss