Ganeshotsav 2024: मानाच्या या गणपती बाप्पाला ‘खुनी गणपती ‘ असे नाव का पडले असेल?

Ganeshotsav 2024: मानाच्या या गणपती बाप्पाला ‘खुनी गणपती ‘ असे नाव का पडले असेल?

Ganeshotsav 2024: धुळे (Dhule) जिल्ह्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याची सुंदर परंपरा निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर पालखी अचानक जड होत असल्याचाही अनुभुती भक्तांना येतेय. धुळ्यात गेल्यावर जुने धुळे भागात ही खुनी मशीद आहे. त्या ठिकाणी बस थांबा ‘खूनी मशिद’ या नावाने आहे. मशिदीच्या प्रशासनाने गणपतीची परंपरा जपली तशी जुन्या धुळ्यातील हिंदू बहुल कॉलनीतील लोकांनीही मशिदीचे पावित्र्य राखले आहे.

१८९४  साली लोकमान्य टिळकांनी (Lokmanya Tilak) गणेश उत्सव सुरू केला. त्यानंतर धुळ्यात १८९५ सालापासून पासून गणेश उत्सव सुरु झाला. खांबेटे गुरुजींनी १८९५ मध्ये खुनी गणपतीची स्थापना झाली. धुळे जिल्ह्यातील मानाचा गणपती म्हणून खुनी गणपतीला ओळखले जाते. या गणपतीला खुनी का म्हटले जाते ? तर त्याचा असा इतिहास आहे. या गणपती विसर्जनाची मिरवणूक १००० वर्ष जुन्या शाही जामा मशिदीवरुन पालखीतून असताना पालखीला त्यावेळी तिकडे विरोध केला. त्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड मारामारी झाली. ब्रिटीशांना घटनास्थळी गोळीबार करावा लागला. या गोळीबारात अनेक जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या मशिदजवळ खूनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नाव असे नाव प्रचलित झाले. या घटनेनंतर ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला. दोन्ही धर्माच्या सन्मानाकरिता त्यावेळी २२८ रुपये दोन्ही गटांना दिले.

मौलानाकडून आरतीची पडली प्रथा

धुळ्यात अनंत चर्तुदशीच्या दिवशी गणपती विसर्जन केले जाते. मानाचा गणपती असलेल्या खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक जल्लोषात पालखीतूनच निघते. यावेळी पारंपरिक पद्धतीत टाळ-मृदुंगाची साथेवर भाविक नृत्य करत सायंकाळी पाच वाजेपर्यंत मशिदीजवळ येतात. त्यावेळी नमाजची अजान होते. खुनी गणपती मशिदीच्या दाराच्या दारासमोर येताच गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते. त्यानंतर मशिदीचे मौलाना फुलांचा हार,आरती घेऊन येतात आणि मशिदीतर्फे गणपतीची आरती करतात. त्यानंतरच मिरवणूक पुढे नेली जाते.

Exit mobile version