पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचं ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचं ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं. मात्र, यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. पुण्यातील पाच मानाच्या गणपतींन पैकी दगडूशेठ हलवाई गणपतीचा आगमन सोहळा ढोल ताशांच्या गजरात होत आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना महंत महेश गिरी यांच्या हस्ते होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास

१८९३ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत आणि सत्यशील प्रस्थ होते. बुधवारपेठेतील दत्त मंदिर ही त्यांची राहण्याची इमारत होती. त्यावेळी पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ यांच्या मुलाचे देहावसान झाले. यावेळी त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ दु:खात होते. त्यांचे गुरू श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले. महाराजांनी त्यांना श्री दत्त महाराज आणि श्री गणपतीची मूर्ती स्थापन करुन, “रोज त्याची पूजा करा. जसे अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्वल करते तसेच ही दोन दैवते तुमचं नाव उज्वल करतील. याचा सांभाळ तुम्ही मुलाप्रमाणे करा” असे सांगितले. यानंतर श्रीमंत दगडूशेठ यांनी दत्त महाराजांची एक संगमरवरी तर गणपतीची मातीची मूर्ती बनवली होती. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते करण्यात आली होती. आज पुण्यातील गणपतींच्या यादीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे नाव आघाडीवर आहे.

हेही वाचा : 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी श्रींची प्रतिष्ठापना

श्रीमंत दगडूशेठ हलवाई प्राचीन मंदिराचे देखावे आणि मंडळाचं वैशिष्ट्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे दरवर्षी सादर केला जाणारा देखावा आणि त्याची विद्युत रोषणाई हा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रिबदू असतो. भारतातल्या प्राचीन मंदिराचे देखावे उभारणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. ज्या लोकांना दूरवरच्या तीर्थक्षेत्राला जाणं होत नाही त्या लोकांना ती मंदिर बघायला मिळावीत हा मंडळाचा उद्देश असतो. शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त गणपतीला नवीन अलंकाराने सजवण्यात आले. भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्यातून दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी ५० किलो वजनाचे नवीन अलंकार करण्यात आले आहेत. साडेनऊ किलो वजनाचा रत्नजडित सुवर्णमुकूट, सूर्यकिरणांची नक्षी असलेले व रंगीत रत्नखडे जडवलेले कान, सातशे ग्रॅम वजनाचे शुंडाभूषण यासह रेशमी वस्त्रावर सोन्याच्या बुट्टय़ा विणून तयार केलेला पोशाख व उपरणे या गणेशोत्सवात मूर्तीस अर्पण करण्यात आले आहे. पु. ना. गाडगीळ सराफ यांनी हे अलंकार घडवले आहेत. ५० कारागिरांनी पाच महिने अनेक तास काम करून मूर्तीचे दागिने घडविले आहेत.

जाणून घेऊया खऱ्या अर्थाने युनिक आणि पर्यावरणपूरक असणाऱ्या गणपतीच्या मुर्त्यांबाबत

Exit mobile version