पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे झाले विसर्जन

पुण्याच्या मानाचा पहिल्या कसबा गणपतीचं ४.१५ मिनीटांनी तर मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन सायंकाळी ५.३० वाजता झालं.

पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे झाले विसर्जन

पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन नुकतेच झाले आहे. त्याचसोबत आता पुण्यामध्ये मानाच्या पाचही गणपतींचे परंपरेनुसार विसर्जन झाले. यावेळी नागरिकांची तुफान गर्दी पहायला मिळाली.

पुण्याच्या मानाचा पहिल्या कसबा गणपतीचं ४.१५ मिनीटांनी तर मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन सायंकाळी ५.३० वाजता झालं. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन हे ७.२२ मिनीटांनी झालं तर मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे विसर्जन सायंकाळी ८.०२ वाजता झालं. तर पाचव्या गणपतीचं ८.५० मिनिटांनी विसर्जन झाले आहे. पुण्यातील पाचही गणपतींचे विसर्जन मोठ्या भक्तीमय वातावरणात करण्यात आलं आहे. यावेळी लेझिम अन् ढोल-ताशाच्या गजरात अवघं पुणे दुमदुमल्याचं दिसून आलं. डेक्कन येथील महापालिकेच्या हौदामध्ये या पाचही गणपतींचे विसर्जन करण्यात आलं असून यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं.

पुणे पालिकेने बांधलेल्या डेक्कन येथील हौदात या मानाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आलं. पुण्यातील मानाचे समजले जाणारे पाच गणपती मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती. या गणपतींच्या विसर्जनाचा कार्यक्रम क्रमाने आखण्यात आला होता.

हे ही वाचा:

ब्रह्मास्त्र झाला जगभरात सुमारे ९००० स्क्रीन्सवर प्रदर्शित, बॉक्स ऑफिसवर होणार ‘इतक्या’ कोटींची कमाई

लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version