spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विसर्जनावेळी भाविकांना दक्षता घेण्याचे आवाहन; रात्री ११च्या सुमारास समुद्राला मोठी भरती

मुंबईतील मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन लवकर होण्याची शक्यता आहे. याचे कारण असे की मंगळवारी म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी रात्री ११ च्या सुमारास समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता आहे. ही भरती बराच वेळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरतीच्या काळात समुद्रात जाणे धोक्याचे ठरणार आहे.

आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे १० दिवसांच्या पाहुणचारानंतर आज दि. १७ सप्टेंबर रोजी विसर्जन होणार आहे. मुंबईमध्ये घरगुती गणपतीसोबतच मोठ्या गणेशमंडळाच्या सार्वजनिक गणेशाचे मोठया थाटामाटात विसर्जन होणार आहे. मुंबईतील बहुतेक मोठ्या मंडळाच्या गणपतीचे विसर्जन हे गिरगाव चौपाटीवर केले जाते. हे विसर्जन दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरु असते. मात्र, यावर्षी मुंबईतील मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन लवकर होण्याची शक्यता आहे. याचे कारण असे की मंगळवारी म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी रात्री ११ च्या सुमारास समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता आहे. ही भरती बराच वेळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरतीच्या काळात समुद्रात जाणे धोक्याचे ठरणार आहे.

मुंबईतील लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि काही मोजके गणपती विसर्जनासाठी तराफ्यावर ठेवून खोल समुद्रात नेले जातात. तर अनेक मंडळाचे कार्यकर्ते गणपतीची मूर्ती उचलून विसर्जनासाठी समुद्रात नेतात. जर समुद्रात मोठी भरती आल्यास विसर्जन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळे रात्री ११ पूर्वी गणपती बाप्पाचे विसर्जन करू शकतात. आज सकाळीच मुंबईचा राजा असलेला गणेशगल्लीचा गणपती विसर्जनासाठी मंडपातून निघाला आहे. संध्याकाळपर्यंत हा गणपती गिरगाव चौपाटीवर पोहचेल. मुंबईचा राजा विसर्जनासाठी सज्ज झाल्यावर इतर सार्वजनिक मंडळाचे गणपती विसर्जनासाठी निघतील.

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर दंश करणारे मासे मत्स्यविकास विभागाच्या पाहणीत आढळले आहेत. त्यामुळे गणेशमूर्तींचे समुद्रामध्ये विसर्जन करताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे. राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने गिरगाव आणि दादर चौपाटी येथे अपायकारक होणाऱ्या माशांच्या अस्तित्वाची चाचणी केली असता त्यात ढोमी, कोळंबी स्टिंग रे जेली फिश, ब्लू जेली फिश आदी मासे आढळले आहेत. त्यामुळे विसर्जनावेळी भाविकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Marathwada Mukti Sangram Day: मग बघा माझ्यासकट माझा आख्खा पक्ष तुमच्यासाठी उभा राहील, काय म्हणाले Raj Thackeray?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss