spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

खेतवाडीतल्या बाप्पाचा अनोखा देखावा, गणपती बाप्पाला विनायकी अवतार का घ्यावा लागला..?

प्रत्येक वेळी आपल्या गणपतीचा वेगळा अवतार असल्याची खात्री खेतवाडीचा सुखकर्ता या वर्षी  साडी नेसलेली गणेशमूर्ती आणली आहे. गणेशाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला आहे. या वर्षीचा खेतवाडी गणपती हा दुसरा कोणी नसून गणपतीचा अवतार आहे.

सध्या देशभरात सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुरु आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षी गणेश मंडळे बाप्पाला ढोलकी आणि त्यावर बसलेला गणपती अशा वेगवेगळ्या रूपात आणण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेळी आपल्या गणपतीचा वेगळा अवतार असल्याची खात्री खेतवाडीचा सुखकर्ता या वर्षी  साडी नेसलेली गणेशमूर्ती आणली आहे. गणेशाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला आहे. या वर्षीचा खेतवाडी गणपती हा दुसरा कोणी नसून गणपतीचा अवतार आहे. हा अवतार गणेशाची स्त्री रूपे विनायक म्हणून ओळखला जातो. पण अनेकांना माहीत आहे का गणपती बाप्पाला विनायकी अवतार का घ्यावा लागला..? चला तर मग जाणून घेऊया त्यामागची कथा काय आहे.

पुराणानुसार अंधक नावाचा एक राक्षस होता जो माता पार्वतीला आपली पत्नी बनवू पाहत होता त्यावेळी भगवान शिवशंकर ह्यांनी अंधकावर हल्ला केला होता, पण जसजसे अंधकाचे रक्त जमिनीवर सांडत होते तसतसे त्या रक्ताच्या थेंबापासून अनेक राक्षसी शक्तीचे निर्माण होत होते. अंधकाचे रक्त जमिनीवर सांडताच अनेक राक्षस निर्माण होऊ लागले. माता पार्वतीला हे उमगले की प्रत्येक प्राणीमात्रामध्ये त्याच्या अवस्थेविरुद्धही एक शक्ती असते. म्हणजे पुरुषामध्ये ताकदीशिवाय एक स्त्रीशक्ती पण असते जिच्यात करुणा आणि क्रोध ह्या दोन शक्ती विराजमान असतात.

देवीला माहित असते की अंधक चूक करतोय आणि आपल्या ताकदीचा अयोग्य वापर करतोय. म्हणून देवी पार्वतीने प्रत्येक देवतेच्या स्त्रीशक्तीला आवाहन केले. त्यानंतर श्रीविष्णूच्या कृपेनें श्रीशंकराची शिवानी देवी, ब्रहमदेवाची ब्राहमी देवी व विरभद्राची भद्रकाली देवी प्रकट झाली. देवी आपल्या दशावतारात राक्षसासमोर प्रकट झाली. ह्या दहा अवतारांनी अंधक राक्षसाच्या राक्षसी शक्तींना मारण्यास सुरुवात केली परंतु अंधक राक्षसाचे रक्त वाहण्याचे थांबू शकले नाही. मग श्रीगणेशानी स्त्री अवतार घेऊन राक्षसाशी युद्ध प्रारंभ केले. त्यांनी आपल्या सोंडेने अंधक राक्षसाचे सर्व रक्त गिळण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या दुष्ट राक्षसाचे रक्त जमिनीवर सांडणार नाही ह्याची खबरदारी घेतली आणि अशा रीतीने अंधक राक्षसाचा समूळ नायनाट झाला व श्रीगणेशाच्या विनायकी अवताराचा उदय झाला. ह्याचसाठी श्रीगणेशाची पूजा स्त्रीरूपात केली जाते.

राजस्थान येथील रेरह ह्या ठिकाणी देवी विनायकीची एक मूर्ती सापडली होती. देवी विनायकीचे चित्ररुपी मंदिर ओरिसा राज्यात हिरापूर येथेही आहे. ह्या मंदिरात 64 योगिनीमधील देवी विनायकी हे रूप पण अस्तित्वात आहे. ह्या मंदिराव्यतिरिक्त 1300 वर्षे जुने तामिळनाडूमधील कन्याकुमारीत थानूमलायन मंदिर ही देवी विनायकीचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या देवीच्या चार हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत. मुख्य म्हणजे ह्या देवीचा चेहरा हुबेहूब श्रीगणेश ह्यांच्यासारखाच आहे.भारताव्यतिरिक्त तिब्बत येथे श्रीगणेशाची पूजा स्त्रीरूपात केली जाते. देवीच्या ह्या रूपाला श्रीगणेशानी असे म्हटले जाते.

हे ही वाचा:

Rajkot Fort: Chetan Patil चा जामीन अर्ज फेटाळला तर Jaydeep Apte च्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Rajkot Fort: Chetan Patil चा जामीन अर्ज फेटाळला तर Jaydeep Apte च्या न्यायालयीन कोठडीत वाढ

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss