… सोन्याची पावलं घेऊन घरा आली, उद्या होणार गौरीचे आगमन

भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपली संस्कृती जपली जाते त्याच बरोबर वेगवेगळे सण साजरे करणे हे देखील आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे.

… सोन्याची पावलं घेऊन घरा आली, उद्या होणार गौरीचे आगमन

भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपली संस्कृती जपली जाते त्याच बरोबर वेगवेगळे सण साजरे करणे हे देखील आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. भारतामध्ये अनेक सण अगदी आनंदाने साजरे केले जातात त्यामधील एक महत्वाचा सण म्हणजे गौरी आणि गणपती सण आहे आणि या सणाची अनेक गणेश भक्त तसेच लोक वर्षभरा आतुरतेने वाट पाहत असतात. बाप्पाचे आगमन हे झाले आहे आणि आता उद्या गौरीचे आगमन होणार आहे.

भाद्रपद महिन्यात शुक्ल सष्टमीला अनुराधा नक्षरात ज्येष्ठा गौरी म्हणजे महालक्ष्मीचं (Mahalakshmi 2022 ) आगमन होत असतं. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरीला पार्वतीचे शक्तीरूप मानले जाते आणि पार्वती ही बाप्पाची आई आहे. तर काही ठिकाणी गौराईना बाप्पाची बहीण मानले जाते. भावा सोबत बहीण माहेरी आली असे समजले जाते. माहेरच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासारखे दुसरे सुख नाही त्यामुळे माहेरपण अनुभवायला बाप्पा बहिणीला घेऊन येतो असेही म्हटले जाते. दोन गौराई असतात. एक असते जेष्ठा तर दुसरी कनिष्ठ. तीन दिवस माहेरपणाला आलेल्या या गौरी घरात प्रसन्नतेचे वातावरण घेऊन येतात. पहिला दिवस त्यांच्या आगमनाचा दुसरा दिवस त्यांच्या पुजनाचा व पाहुणचाराचा आणि तिसरा दिवस त्यांच्या विसर्जनाचा असे एकुण तीन दिवस त्यांचे वास्तव्य घराघरात असते. अनुराधा नक्षत्रावर त्यांची स्थापना केली जाते ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे पुजन आणि मुळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन करण्यात येते. गौरींच्या आगमनापासुन तर विसर्जनापर्यंत सारं निराळच असतं. चैतन्यानं भारलेलं वातावरण असतं. तीचे आगमन होतांना “कोण आलं? ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठा आली सोन्याची पावलं घेऊन घरा आली” असं म्हणण्याची परंपरा आहे.

ज्येष्ठा गौरी सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया हा उत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. या सणाला मराठवाड्यात महालक्षमी देखील म्हटले जाते. राज्याच्या वेगवेगळ्या भागात हा उत्सव साजरा करण्यच्या प्रथा थोड्याफार प्रमाणात वेगवेगळ्या आहेत. या उत्सवाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करून सडा, रांगोळी करून शुभ मुहूर्तावर माता गौरीची स्थापना केली जाते. ज्येष्ठा गौरींसाठी सुंदर मखर सजवले जाते आणि गौरींना वेगवेगळे फळे अर्पण केली जातात आणि धान्यांच्या राशी लावल्या जातात. दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते. यादिवशी गौरींसाठी वेगवेगळ्या गोडाधोडाच्या पदार्थांचा नैव्यद्य बनवला जातो. यात १६ प्रकारच्या भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ इतर पदार्थ बनवले जातात. यानंतर १६ किंवा ३२ दिव्यांनी गौरींची आरती केली जाते आणि त्यांना नैवद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी गौरींना निरोप दिला जातो.

गौरीपूजन यास महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली.त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.

हे ही वाचा:

भारतीय नौदलालाचा नवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित

पहिली स्वदेशी युद्धनौका भारतीय नौदलात सामील

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version