मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी

गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूशखबर दिली आहे. गणेशोत्सवासाठी (Ganeshostav) कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी

गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूशखबर दिली आहे. गणेशोत्सवासाठी (Ganeshostav) कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. गणपतीसाठी मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात. अशा गणेशभक्तांसाठी टोल माफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देश देऊन गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.

राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्नीशमन वाहन तैनात करावेत. महापालिकांनी गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्नीशमन वाहनासाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नये, असेही निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याचबरोबर, सर्वंत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मंडळांनी देखील सहकार्य करावे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पुणे येथील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मुर्तीचा पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुनरावर्तन हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

हे ही वाचा:

१५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या दिवसांची सुट्टी आता होणार आनंददायी; Central Railway चालवणार १८ विशेष रेल्वे गाड्या!

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Exit mobile version