spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Chocolate Modak Recipe: गणपती बाप्पासाठी यावेळी खास चॉकलेट मोदकाचा प्रसाद बनवा; जाणून घ्या रेसिपी….

Chocolate Modak Recipe: गणेश चतुर्थीचा सण सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्राच नाही तर देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदक अर्पण केले जातात. तुम्हीही घरात आलेल्या बाप्पाला मोदक अर्पण करत असाल तर यावेळी दरवर्षी सारखे मोदक न बनवता यावेळी चॉकलेटचे मोदक करून पहा. घरात रोज वेगवेगळे पदार्थ नैवेद्याला बनवण्याची परंपरा आहे. त्यासाठीच या वेळी काही वेगळं करून पहा. म्हणूनच चॉकलेट मोदक ही पूर्णपणे वेगळी रेसिपी ठरेल. चला तर मग जाणून घेऊया चॉकलेटचे मोदक कसे तयार करायचे.

बाजारात गणेशोत्सवात देवाला अर्पण करण्यासाठी विविध प्रकारचे मोदक उपलब्ध होतात. पण आपल्या गणपती बाप्पाला स्वतःच्या हाताने बनवलेले मोदक अर्पण केल्याने वेगळं सुख आणि जास्त आनंद मिळतो.

साहित्य:
एक वाटी तांदळाचे पीठ
अर्धी वाटी मैद्याचे पीठ
दोन ते तीन चमचे देशी तूप
चिमूटभर मीठ
चॉकलेट सॉस
एक कप खवा
अर्धा कप साखर
अर्धा कप चॉकलेट चिप्स किंवा किसलेले चॉकलेट.
ड्रायफ्रूट

कृती:
१) प्रथम कढईत तूप घालून खवा हलका तळून घ्या.
२) त्यानंतर चॉकलेट चिप्स किंवा किसलेले चॉकलेट आणि ड्रायफ्रूट,साखर घालून मिसळून ठेवा.
३) आता खव्याचे बनवलेले हे मिश्रण बाजूला करून ठेवा आणि मोदक बनवायची तयारी करा.
४) मोदक बनवण्यासाठी तांदळाचे पीठ आणि मैद्याचे पीठ मिक्स करून घ्या.
५) मग या मिश्रणात गायीचे तूप टाकून मोहन बनवून घ्यावे.
६) हे तांदूळ आणि मैद्याचे कणीक व्यवस्थित मळून घ्या आणि थोडा वेळ झाकून ठेवा. थोडा वेळ सेट होऊ द्या.
७)दहा ते पंधरा मिनिटांनंतर ठेवलेल्या पिठाचे गोळे करुन घ्या. या गोळ्यांना गोलाकार आकार द्या.
८) आता या आकार दिलेल्या गोळ्यामध्ये चॉकलेट आणि खव्याचे तयार केलेलं मिश्रण भरा आणि त्याला मोदकाचा आकार देऊन सर्व्ह करा.
अश्याप्रकारे तुमचे चॉकलेटचे मोदक खाण्यासाठी तयार होतील.

हे ही वाचा:

तर Devendra Fadnavis मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत; BJP आमदार Parinay Fuke यांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ

Congress, Sharad Pawar गट मुख्यमंत्रीपदासाठी Uddhav Thackeray यांचे नाव कधीही घोषित करणार नाहीत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचे मोठे विधान

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss