spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: राज्यभरात ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे आगमन

Ganeshotsav 2024: गणेश चतुर्थीनिमित्त राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. गेले वर्षं आतुरतेने वाट पाहिल्यानंतर आज (शनिवार, ७ सप्टेंबर) बाप्पाचे आगमन झालेलेआहे. राज्यभरात गणेश आगमनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईत लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तर पुण्यातदेखील मानाच्या पाच गणपतीचे थाटात आगमन झाले आहे. राज्यभर गणेश भक्तांचा जल्लोष पाहायला मिळत असून टाळ मृदुंग, ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात आले आहे.

मानाच्या भाऊसाहेब रंगारी गणपतीची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक

पुण्यातील मानाच्या भाऊसाहेब रंगारी गणपतीची ढोल तशाच्या गजारात मिरवणुक पार पडली आहे. भाऊसाहेब रंगारी भवन बुधवार चौक अप्पा बळवंत चौक फुटका बुरुज ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरापर्यंत मिरवणूक पार पडली. यावेळी नागरिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. उत्सव प्रमुख पुनीत बालन हे पत्नीसह या मिरवणुकीत सहभागी झाले होते. प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या हस्ते दुपारी १२. ३० वाजता बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे

ठाण्यामध्ये लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या टिळक आळीतील गणरायाची प्रतिष्ठापना

लोकमान्य टिळक यांनी स्वतः स्थापन केलेला ठाण्यातील एकमेव सार्वजनिक गणपती म्हणजेच चरईतील लोकमान्य आळीतील गणपती. लोकमान्य टीळकांची ठाणे कारागृहातून सुटका झाल्यानंतर लोकमान्य टिळक यांनी या ठिकाणी येऊन भाषण केले होत आणि या गणपती मंडळाची 1920 साली स्थापना देखील केली होती. यावर्षी या गणेशोत्सव मंडळाने 105 व्या वर्षात पदार्पण केले आहे, कोणत्याही प्रकारे डीजे किंवा आरडाओरडा न करता लोकमान्य टिळकांना अपेक्षित असा गणेशोत्सव हे मंडळ दरवर्षी साजरा करतात. या गणेशोत्सव मंडळाची फक्त दीड फुटांची मूर्ती असते.

कोल्हापुरात जल्लोषी वातावरणात गणपती बाप्पाचे आगमन

कोल्हापुरात देखील वाजत गाजत गणेशाचे आगमन झाले आहे. घरगुती गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी कोल्हापुरातील कुंभार गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशभक्त आणि ग्राहकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातील कुंभार गल्ली मध्ये उत्साह पूर्ण वातावरण दिसून येत असून भाविक वाजत गाजत आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जात आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी गणराया विराजमान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना व पूजा केली. गणेशोत्सवानिमित्त वर्षा निवस्थानाला फुलांची सजावट करण्यात आली आहे

छत्रपती संभाजीनगर ग्रामदैवत संस्थान गणपती विराजमान

आज शहरासह सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. शहराचे आराध्य दैवत संस्थान गणपती येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन आज गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गणरायाला साकडे घातलं आहे की हा गणेशोत्सव शांततेत आणि व्यवस्थित पार पडू दे. महाराष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याची वेळ आली आहे आणि ते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेतृत्वात होऊ दे, अशी प्रार्थना श्री गणरायाच्या चरणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

आमदार मदन येरावार यांच्या घरी चांदीच्या बाप्पाचे आगमन

आज सर्वत्र वाजत गाजत लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. यवतमाळमध्ये आमदार मदन येरावार यांच्या घरी 55 वर्षांपासुन चांदीचा गणपती बसवला जाण्याची परंपरा आहे. भक्तीमय वातावरणात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांच्या पाठिशी राज्यसरकार उभे आहे. राज्यात सुख समृद्धी येवो, असे साकडे आमदार येरावार यांनी गणरायाकडे घातले.

ठाण्यात वागळेच्या राजाचे जल्लोषात आगमन

सर्व ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाच वाजत गाजत स्वागत करताना पाहायला मिळत आहेत. ठाण्यातील शिवचैतन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वागळे चा राजाच हे 53 वे वर्ष असून वागळेच्या राजाचे पारंपारिक वाद्यांसह आगमन सोहळा पार पडला. यावेळी टाळ मृदुंग, ढोल ताशा पथक शिवकालीन मर्दानी खेळ , त्याचप्रमाणे सनई संबळाच्या तालावर बापाचे स्वागत स्थानिक नागरिकांसह मंडळातल्या सदस्यांनी केले.

हे ही वाचा:

Ganeshotsav 2024: एक वाटी गव्हाचे पीठ आणि झटपट मोदक तयार…

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा!…

Ganeshotsav 2024: यंदाच्या गणपतीत बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss