spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: पुण्याच्या कसबा पेठेतील या मंदिराबद्दल माहिती आहे का तुम्हाला? जाणून घ्या इतिहास…

Ganeshotsav 2024: संपूर्ण देशभरात गणेश उत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना दिसत आहे. बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि चैतन्याचे वातावरण आहे. गणपती म्हणजे गणांचा अधिपती आणि विनायक म्हणजे विशिष्ट रूपानं जो नायक आहे. जसं गणपती बाप्पाला या विशेष नावांनी ओळखलं जातं, तसंच पुण्यातल्या (Pune) काही देवतांना वेगवगेळ्या नावांनी ओळखलं जातं. ही वेगवेगळी नावं ऐकून अनेकांना मनात अनेक प्रश्न पडत असतात. आता आपण अशाच एका गणपती मंदिराबाबत आणि त्या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे ते जाणून घेऊ.

पुण्यातील गुंडाचा गणपती (Gundacha Ganpati):
पुणे( Pune) शहरातील कसबा पेठेत श्री सिद्धिविनायक गुंडाचा गणपती नावाचं एक प्रसिद्ध मंदिर आहे. त्याचं कारण असं की, त्या परिसरात गुंड आडनावाची बरीच घरं होती म्हणून या गणपती मंदिराला गुंडाचा गणपती असे नाव पडले. गणपतीच्या मूर्तीवरील कवच ३ एप्रिल १९७५ साली निघालं आणि त्याच्या आतमध्ये सुंदर आणि प्राचीन अशी मूर्ती मिळाली, मात्र ती मूर्ती भग्नावस्थेत होती. काही तज्ज्ञांच्या मते, ही मूर्ती १२ व्या किंवा १३ व्या शतकातील असावी. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना शक्य नसल्यामुळे १९७६ मध्ये नवीन मूर्ती बनवण्यात आली आणि तिची प्राणप्रतिष्ठा या मंदिरात करण्यात आली. गोपाळराव व्यवहारे जोशी यांनी पुढाकार घेऊन मंदिराचे रुप पालटून टाकले.

मूर्तीचे वर्णन :
पुण्यातील ( Pune) ‘गुंडाचा गणपती’ची मूर्ती ४ ते ५ फूट उंचीची आहे. ही मूर्ती संपूर्ण पाषाणाची आहे. या शेंदरी रंगाच्या गणपतीची सोंड उजव्या बाजूला असून, ती चतुर्भुज मूर्ती आहे. या मूर्तीच्या डाव्या हातात मोदक, तर उजवा खालील हात अभयहस्त, वरच्या दोन्ही हातांमध्ये पाशांकुश आहे. तसेच अंगभूत पीतांबरही आहे. हत्तीच्या शिरभागातील गंडस्थळ, मोठे कान, प्रशस्तपणा या सर्व गोष्टी लक्षवेधी ठरतात. ही मूर्ती पाषाणाच्या बैठकीवर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे अत्यंत प्रभावी आहेत.

हे ही वाचा:

तर Devendra Fadnavis मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत; BJP आमदार Parinay Fuke यांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ

Congress, Sharad Pawar गट मुख्यमंत्रीपदासाठी Uddhav Thackeray यांचे नाव कधीही घोषित करणार नाहीत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचे मोठे विधान

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss