Ganeshotsav 2024 : तुम्हाला माहीत आहे का गणेशोत्सवात आरती झाल्यानंतर प्रदक्षिणा का घातल्या जातात ?

Ganeshotsav 2024 : तुम्हाला माहीत आहे का गणेशोत्सवात आरती झाल्यानंतर प्रदक्षिणा का घातल्या जातात ?

हिंदू धर्मात अनेक रूढी-परंपरा पाळल्या जातात. प्रत्येक परंपरा पाळण्यामागे एक विशिष्ठ महत्व आणि कारण हे असतंच. गणेशोत्सव (Ganesh Chaturthi)आता अवघ्या काहीच दिवसांवर ठेपला आहे. यावर्षी ७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे आगमन घरोघरी होणार आहे. या उत्सवात सगळीकडेच भरपूर उत्सव आणि जल्लोष पाहायला मिळतो. गणेशोत्सव म्हंटलं का पूजा विधी, नैवेद्य, आरती अश्या बऱ्याच गोष्टींची धांदल सुरु असते.

घरोघरी मोठ्या उत्साहात सर्वजण गणपती बाप्पाची आरती भक्तिभावाने म्हंटल्या जातात. अनेकांना आरत्या पाठ नसतात तरीही ते सर्वांसोबत आरती बोलण्याचा प्रयत्न करत असतात. आरती म्हणजे देवाला आर्ततेने मारलेली हाक. तासंतास आरती झाल्यावर आपण शेवट करतो तो संत नामदेवांनी लिहिलेलया एका अभंगाने. त्या अभंगात संत नामदेवांनी म्हंटले आहे की, ”भगवंता, यदाकदाचित जेव्हा तू आम्हा भक्तांना भेटशील तेव्हा मी तुझ्यासमोर लोटांगण घालेन आणि चरणांना वंदन करेन.

परंतु ‘घालीन लोटांगण’ म्हणताना आरती संपण्यापूर्वी स्वतःभोवती प्रदक्षिणा घालण्याची गरज नाही. कोणत्याही शास्त्रात ‘घालीन लोटांगण’ म्हणताना प्रदक्षिणा घालण्याची प्रथा नाही. प्रदक्षिणा न घालता आरती पूर्ण करावी. मंत्रपुष्पांजली म्हणून झाल्यावर मंदिराला प्रदक्षिणा घालावी आणि नंतर देवासमोर साष्टांग नमस्कार घालावा आणि ज्या ठिकाणी देवाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल त्या ठिकाणी स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी मग साष्ठांग नमस्कार करावा असे शाश्त्रात आहे. परंतु साष्ठांग नमस्कार हा स्त्रियांनी घालू नये असं शाश्त्रात सांगितले आहे. स्त्रियांनी पंचांग नमस्कार घालावा. कारण स्त्रियांनी आपले पूर्ण शरीर जमिनीवर पालथे पडू देऊ नये असे शास्त्रात सांगितले आहे.

स्वतःभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठीच मंत्र :
यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च |
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ||

त्यामुळे यापुढे तुम्ही ‘घालीन लोटांगण’ झाले की लगेच प्रदक्षिणा घालायला सुरुवात करू नये. त्याबरोबर आजूबाजूला असलेल्या व्यक्तींनाही ही माहिती सांगा.

हे ही वाचा:

Exit mobile version