Ganeshotsav 2024: कोकणातील या गावामध्ये कोणत्याही घरात केले जात नाही गणेश चतुर्थीला गणेश पूजन; काय आहे कारण ?

Ganeshotsav 2024: कोकणातील या गावामध्ये कोणत्याही घरात केले जात नाही गणेश चतुर्थीला गणेश पूजन; काय आहे कारण ?

Ganeshotsav 2024: गणेशोत्सवाचा खरा उत्साह महाराष्ट्रातील कोकणातच पाहायला मिळतो. कोकणात गणेश उत्सव साजरा करण्याच्या अनेक प्रथा आणि परंपरा मानल्या जातात. घराघरांत कमालीचा उत्साह पाहायला मिळतो. देशविदेशात राहणारे कोकणवासी गणेश उत्सवात हमखास कोकणात जातात. भजन (Bhajan) , नमन( Naman), झाकडी (Zakdi) , दशावतार (Dashavtaar) यांसारखे अनेक पारंपरिक कला प्रकार सादर केले जातात. तसेच घरात गणपतीची स्थापना करून मनोभावे सेवा आणि पूजा अर्चा केली जाते.

परंतु, कोकणातील मालवणमध्ये( Konkan- Malvan) एक असे गाव आहे जिथे घरात गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना केली जात नाही. सिंधुदुर्ग जिल्यात ( Sindhudurg) कोईळ या गावात ही प्रथा आहे. या गावात कोणत्याही घरी गणेश चतुर्थीला गणपती बसवला जात नाही. या गावात साडे तीनशे ते चारशे घरे आहेत पण कोणत्याही घरात गणपती आणला जात नाही.

काय कारणं ?
याचे कारण असे आहे की, या गावात एक गणपतीचे मंदिर आहे. त्याच मंदिरात गावकऱ्यांना गणपती बाप्पाची पूजा केली जाते. शेकडो वर्षांपासून ही प्रथा या गावात पाळली जात आहे. जर कोणत्याही ग्रामस्थांनी घरात गणपती बाप्पाची पूजा आणि स्थापना केली तर त्यामध्ये विघ्न निर्माण होतात, असे ग्रामस्थांद्वारे सांगितले जाते. कोणत्याही शुभ कार्य प्रसंगी याच मंदिरात असलेल्या गणपतीची पूजा केली जाते.

सात दिवस या गावात हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान गावातील देवळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्या दिवसात गणपती मंदिरात सत्यनारायणाची पूजा केली जाते. प्रथेप्रमाणे पूर्वापार चालत आलेली पद्धत म्हणजेच कोणत्याही कार्याची सुरुवात ही श्री गणेशाला वंदन आणि पूजनच करून केली जाते.

Exit mobile version