spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: “गौराई आली…गाईवासरांच्या पावलाने आली…” जाणून घ्या गौराई पूजनाची कथा

गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला होता. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.

सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होताना दिसत आहे. आज दि. १० सप्टेंबरला गौरी आवाहनाचा दिवस आहे. गौरी आवाहनानंतर दुसऱ्या दिवशी ११ सप्टेंबरला गौरी पूजनाचा दिवस आहे. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला होता. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरीपूजनाला काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. या गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केलं जातं म्हणून याला ज्येष्ठा गौरी असही म्हंटलं जातं.

विविध भागात गौरीपूजनाच्या आणि मांडणीच्या पद्धतीत आधुनिकता असू शकते. काही कुटुंबात गौरीचे मुखवटे असतात तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी तर पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साधी चोळी नेसवून त्यांची पूजा करतात. काही घरांमध्ये धान्याची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एक दोन धान्यांचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्रे, लोखंडी सळ्या किंवा सिमेंटचे स्टॅन्ड मिळतात त्यावर गौरीचे मुखवटे ठेवतात आणि त्याला साडी नेसवून विधिवत पूजा करतात. काही घरांमध्ये सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात किंवा गहू तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात.

ज्येष्ठा गौरीच्या आवाहनाच्या वेळी दोन गौरी बसविण्याची प्रथा आहे. त्यामधील एक गौरी घरातच असते, तीच लक्ष्मी होय तर एक गौरी बाहेरून आणली जाते. तीच ज्येष्ठा गौरी होय. ही ज्येष्ठा गौरी घरात येताना तिचाही उल्लेख लक्ष्मी या नावानेच केला जातो. जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलावर ती थोडी थांबवून लक्ष्मीच्या विविध प्रकारांचा उल्लेख होतो. त्यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो. हीच संकल्पना महिला आपल्या भाषेत “गौर आली गौर, कशाच्या पावलांनी आली”? “गाईवासरांच्या पावलाने आली”, असे म्हणतात. ही आठ पाऊले असून त्यात आपल्या गरजेनुसार गाईवासरे, धनधान्य, अलंकार, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य, व्यवसायातील प्रगती, परीक्षेतील यश अशा अनेक मनोकामनांचा उल्लेख केला जातो. गौरीच्या व्रतादिवशी सासुरवाशिणींना माहेरी विशेष मान असतो. या दिवशी माहेरवाशिणींचे लाड पुरविले जातात.

हे ही वाचा:

Devendra Fadnavis यांची सभा उधळण्याचा Congress नेत्याचा इशारा, प्रशासनाला मराठा आंदोलकांचीसुद्धा धास्ती

Congress, Sharad Pawar गट मुख्यमंत्रीपदासाठी Uddhav Thackeray यांचे नाव कधीही घोषित करणार नाहीत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचे मोठे विधान

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss