spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: गौरी विसर्जन कोणत्या कालावधीत करायचे आणि कोणते नियम पाळायचे आहेत ते जाणून घेऊयात सविस्तर…

Ganeshotsav 2024: गौरी पूजनाच्या तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन करण्यात येणार आहे. यावर्षी गौरी विसर्जनाचा मुहूर्त (Gauri Visarjan Muhurat) १२ सप्टेंबर रोजी दुपारी १. ३१ ते रात्री ९.५१ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचसोबत ज्यांचे गौरी गणपती विसर्जन होते आज त्यांचे गणपतीही विसर्जन होतील. तर गौरी विसर्जन कोणत्या कालावधीत करायचे आणि विसर्जन करताना कोणते नियम पाळायचे आहेत हे आपण जाणून घेऊ.

बऱ्याच घरांमध्ये गौरीला हळद कुंकू लावून विसर्जन विसर्जन केले जाते तसेच सौभाग्याच्या थाळीचे वाण पाच महिलांना दिले जाते. गौरीच्या उत्तर पूजेसाठी गौरीला हळद, सिंदूर, चंदन, सुका मेवा, नारळ, सुपारी आणि फराळाचे पदार्थ, अगरबत्ती आणि इतर अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात. पूजेनंतर या पाच थाळ्या पती आणि कुटुंबासोबत पाच निमंत्रित महिलांना दिल्या जातात. नैवेद्यरूपी एखादी मिठाई दिली जाते. त्यांना देवीचे रूप मानून पूजा केली जाते, त्यामुळे त्यादेखील दिलेल्या पूजेचा आणि दानाचा आनंदाने स्वीकार करतात. गौरीची आरती केली जाते. देवीवर अक्षता वाहून दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. देवीच्या पाहुणचाराचा समारोप दही भात दाखवून केला जातो. सोबतच विडा दिला जातो. ‘पुनरागमनायच’ असे म्हणत देवीला पुढल्या वर्षी परत ये असे आमंत्रण दिले जाते.

काही ठिकाणी, गौरीला निरोप देणारी गाणी या समारंभात गाण्याची पद्धत असते. तसेच विविध प्रकारच्या आरत्या म्हणून देवीची संगीत सेवा केली जाते. गौराई सोनपावलांनी येते तशी सुख, समृद्धी देऊन जाते म्हणून येताना जसे कुंकवाने किंवा रांगोळीने देवीच्या पावलांचे ठसे काढले जातात, तसेच देवी जाताना तिला बसवलेल्या स्थानापासून घराच्या मुख्य दारापर्यंत देवीची पावलं रांगोळीने किंवा कुंकवाने काढून देवीला निरोप देण्याची काही ठिकाणी प्रथा आहे. जिथे मातीच्या मुखवटच्या गौरी असतात त्या वाहत्या पाण्यात विसर्जित केल्या जातात. परंतु ज्यांच्या गौरीचे मुखवटे सोने, चांदी किंवा पंचधातूची असतील त्या आणि इतर दागिने काढून घेऊन देवीचे विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर त्यातलीच थोडी माती आणि खडे आणून घरातल्या चौरंगावर ठेवले जातात.

हे ही वाचा:

आरक्षणावरील Rahul Gandhi यांच्या विधानाचा BJP कडून विपर्यास, Nana Patole यांचे टीकास्त्र

Sandeep Deshpande Exclusive: कोणाचं आडनाव काय आहे, याने मला फरक पडत नाही कारण…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss