spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक गणपतीबद्दल जाणून घेऊयात…

Ganeshotsav 2024: गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. आपले इच्छित कार्य पूर्ण व्हावे यासाठी प्रथम गणपतीचे पूजन करून त्याचे आशीर्वाद घेतले जातात. अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट’ आणि ‘विनायक’ या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम गणपतीला वंदन आणि पूजा केली जाते.

सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर गणपती अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती आहे. हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठी वसलेले आहे.या गणपतीला ‘सिद्धिविनायक’ (Siddhivinayak)असेही म्हणतात. असे मानले जाते की भगवान विष्णूंनी मधु आणि कैटभ या दैत्यांचा वध करण्यासाठी येथे श्री गणेशाची आराधना केली होती. त्यामुळे या गणपतीला सिद्धिविनायक आणि या ठिकाणाला सिद्धटेक असे नाव पडले.मंदिराच्या स्थापत्यकलेत पितळी मखर, चंद्र-सूर्य-गरुड यांच्या सुंदर प्रतिमा आहेत. गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच आहे आणि उजव्या सोंडेची आहे. गणपतीच्या मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मूर्त्या आहेत. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्यामुळे सोवळे कडक पाळले जाते. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो.

पेशवेकालीन इतिहास
पेशवेकालीन महत्त्व असलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्षे लढाई करत होते. परंतु युद्धात त्यांना यश मिळत नव्हते. तेव्हा भगवान शंकरांनी श्रीविष्णूना गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून श्रीविष्णूनीअसुरांचा वध केला होता.

मंदिराकडे जाण्याचा मार्ग
मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे श्री सिद्धेश्वर हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफुला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो. सिद्धटेकला जाण्यासाठी यात्रेकरूंना सोयीचे रेल्वे स्थानक म्हणजे दौंड (Daund Railway Station). दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ किलो मीटर इतके आहे. पूर्वी दौंडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागत असे.पण आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने होडीने जावे लागत नाही. गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात.

Latest Posts

Don't Miss