spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील थेऊर चिंतामणी गणपतीविषयी जाणून घेऊयात…

अष्टविनायकांपैकी एक असलेला थेऊर गणपती, ज्याला चिंतामणी गणपती (Chintamami Ganpati) म्हणूनही ओळखले जाते, हे भगवान गणेशाला समर्पित असलेले एक पूजनीय मंदिर आहे. चिंतामणी गणेश मंदिर जे महाराष्ट्रतील पुणे जिल्हयात स्थित आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील थेऊर (Theoor) या छोट्या गावात आहे. हे प्राचीन गणेश मंदिर आठ अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे. जे महाराष्ट्रातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध गणेश मंदिर मानले जाते.

थेऊर गणपती मंदिराचा इतिहास

थेऊर गणपती मंदिर साधारणपणे सतराव्या शतकातील आहे. या मंदिराचे बांधकाम पेशवे राजवटीच्या काळात (Peshwa Era) बांधले गेले असे मानले जाते. हे मंदिर पेशवे शासक, मोरोबा दादांनी दिलेल्या वचनाची पूर्तता असल्याचे म्हटले जाते, जे एक निष्ठावान गणेश उपासक होते. पौराणिक कथेनुसार, मोरोबा दादा पेशवे हे निपुत्रिक होते आणि त्यांनी वारसासाठी गणेशाचा आशीर्वाद मागितला होता. त्यामुळे मुलाच्या जन्मानंतर त्यांनी कृतज्ञतेने आणि इच्छापूर्तीमुळे हे गणेश मंदिर बांधले.

थेऊर मंदिराचे महत्त्व
या मंदिराची ख्याती चिंता दूर करण्याशी संबंधित आहे. थेऊर चिंतामणी गणपतीची पूजा केल्याने मानसिक तणाव दूर होतो आणि मनःशांती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

थेऊर गणेश मूर्ती

थेऊर मंदिराचे स्थापत्य हे पेशवे आणि मराठा शैलींचे मिश्रण आहे. ज्यामध्ये भव्य प्रवेशद्वार, एक प्रशस्त सभामंडप आणि गणेशमूर्ती असलेले गर्भगृह आहे. काळ्या पाषाणापासून बनवलेली ही मूर्ती सुमारे दोन फूट उंचीची असून तिचे डोके सपाट, कपाळ रुंद आणि सोंड डावीकडे वाकलेली आहे.

पूजा आणि सण

थेऊर गणपतीची पूजा मोठ्या थाटामाटात केली जाते, विशेष म्हणजे गणेश चतुर्थी उत्सवात. गणेश भक्त गणपतीला मनोभावे मोदक, फुले आणि फळे अर्पण करतात. आनंद, समृद्धी आणि बुद्धी प्रदान करण्यासाठी गणपती बाप्पाकडून आशीर्वाद मागतात. माघी चतुर्थी आणि गणेश जयंती या सणांमध्येही हे गणेश मंदिर भाविकांना आकर्षित करते.

हे ही वाचा:

PM Narendra Modi युक्रेनमध्ये जातात पण पेटलेल्या मणिपूरला भेट देत नाहीत: Sanjay Raut

Congress चा आरक्षणविरोधी चेहरा समोर, Rahul Gandhi यांच्या आरक्षणावरील वक्तव्यावरून CM Eknath Shinde यांची टीका

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss